

लोगो : जिल्हा बँक निवडणूक
आठ माजी संचालकांची सुनावणी पूर्ण; रविवारपर्यंत येणार निर्णय
उमेदवारी अर्ज अपात्र प्रकरण : माजी संचालकांमध्ये पडले दोन गट
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अपात्र झालेल्या आठ माजी संचालकांनी केलेल्या अपिलावर आज सहनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे सुनावणी झाली. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सुनावणीनंतर दहा दिवसांच्या आत निकाल देणे आवश्यक आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे. पुण्यातील सहनिबंधक कार्यालयाला उद्यापासून (शनिवार, ता. ७) बुधवारपर्यंत (ता. ११) सुट्टी असल्याने या अपिलाचा निकाल कधी येणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
सहकार कायद्याच्या कलम ८८ अन्वये व सहकार कायद्याच्या कलम ११० अ अन्वये झालेल्या कारवाईमुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी हे उमेदवारी अर्ज अपात्र केले आहेत. माजी संचालक रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, दिलीप माने, राजन पाटील, जयवंतराव जगताप, बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे आणि रश्मी बागल या आठ जणांचे अर्ज कलम ८८ च्या कारवाईमुळे अपात्र करण्यात आले आहेत. यातील बागल व राजन पाटील वगळता इतर सहा संचालकांनी अपिलात धाव घेतली आहे. मी पैसे भरण्यास तयार आहे; मात्र पैसे भरून घेण्यास बँकेने नकार दिल्याचे पत्र यातील काही माजी संचालकांनी दिले आहे. तसेच कलम ११० अ नुसार कारवाई होण्यापूर्वी आम्ही राजीनामा दिल्याचेही काही संचालकांनी सांगितले आहे. त्यामध्ये ‘पत्र देणारे व पत्र न देणारे संचालक’ असे दोन गट या प्रकरणात पडले आहेत.
कलम ११० अ अन्वये झालेल्या कारवाईमुळे माजी संचालक प्रशांत परिचारक व सिद्धाराम म्हेत्रे यांचे अर्ज अपात्र झाले आहेत. या दोघांनीही अपिलात धाव घेतली आहे.
चौकट...
उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचाही पर्याय
सहनिबंधकांचा उमेदवारी अर्ज अपात्रतेचा निर्णय कायम राहिल्यास या माजी संचालकांना उच्च न्यायालय व त्यानंतर सर्वोच्च न्यायालय हे पर्याय राहणार आहेत. अर्ज माघारीची प्रक्रिया १७ नोव्हेंबरपर्यंत राबविली जाणार आहे. त्यानंतर १८ नोव्हेंबरला चिन्हवाटप व निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.