जिल्ह्यात सुमारे आठ लाख हेक्टर पिकांचे नुकसान

जिल्ह्यात सुमारे आठ लाख हेक्टर पिकांचे नुकसान
Published on: 

जिल्ह्यात सुमारे ८ लाख
हेक्टर पिकांचे नुकसान
पंचनाम्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांच्या आठ लाख हेक्टरवरील खरीप पिके, ऊस आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या संयुक्त पंचनाम्यांचा अंतिम अहवाल शुक्रवारी (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सुमारे ११५० कोटी रुपयांचा निधी लागणार असून, त्यासंबंधीचा प्रस्ताव सोमवारी (ता. २५) राज्य सरकारकडे पाठविण्यात येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर खरीप पिकांसह ऊस आणि फळबागांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. या प्रक्रियेत मोठ्या क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचे समोर आले आहे. सुमारे आठ लाख हेक्टरवरील नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेती अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचा संयुक्त अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. आता या अहवालाच्या आधारे मदतीसाठी निधीची मागणी राज्य सरकारकडे केली जाणार आहे. सोमवारी प्रस्ताव सादर झाल्यानंतर शासनस्तरावर पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या मदतीकडे लागले आहे.
---
चौकट
ऊस, द्राक्ष, डाळिंबाला मोठा फटका
- ऊस : सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर
- द्राक्षबागा : सुमारे १८ हजार हेक्टर
- डाळिंब बागा : सुमारे ४० हजार हेक्टर
- एकूण बाधित शेतकरी : सुमारे ९ लाख
- अपेक्षित मदत निधी : सुमारे ११५० कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com