बळकावलेल्या जागांवर नई जिंदगी (भाग-३)

बळकावलेल्या जागांवर नई जिंदगी (भाग-३)
Published on: 

बळकावलेल्या जागांवर नई जिंदगी (भाग-३)

‘नोटरी’वर मृत अन् हयात नसलेल्या वकिलांचे शिक्के
महापालिकेत डोळे झाकून मिळकत नोंदी; २०१० मधील मृताच्या नावे २०१४ सालचा स्टॅम्प

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर, ता. ५ : सन २०१० मध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या नावे २०२४ मध्ये स्टॅम्प घेऊन त्यावरील मूळ तारीख खोडून १२ मार्च २०१४ अशी तारीख टाकल्याचे एमआयडीसी पोलिसांना एका गुन्ह्याच्या तपासात ध्यानात आले. या स्टॅम्पद्वारे केलेल्या नोटरींवरील एच. एल. खान आणि एल. पी. देशपांडे या नोटरी वकिलांबद्दल पोलिसांनी कोषागार कार्यालयाकडे माहिती विचारली. त्यावेळी त्या नावाचे वकील अस्तित्वातच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. अस्तित्वातच नसलेल्या वकिलांचे शिक्के मारून नोटरीद्वारे महापालिकेकडे किती मिळकतींच्या नोंदी लावल्या, याची पोलिसांनी विचारणा केली. यावेळी एकाच वर्षात २९ जणांनी ४३ प्लॉटच्या मिळकत नोंदीसाठी बनावट नोटरी दिल्या आणि महापालिकेनेही डोळे झाकून त्याच्या नोंदी लावल्याचे उघड झाले आहे.

राजकीय टार्गेट ठेवून जागा बळकावणारे रॅकेट शहर मध्य व दक्षिण सोलापूर मतदारसंघातील शहर हद्दीतील जागा बळकावत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार तपास केल्यावर एच. एल. खान आणि एल. पी. देशपांडे या वकिलांचे बनावट शिक्के मारून बनावट नोटरीद्वारे महापालिकेकडे सहजपणे मिळकत नोंदी लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात २०१० मध्ये मृत झालेल्या नारायण नरसय्या दंडी यांच्या नावे २०२४ मध्ये स्टॅम्प घेतला; परंतु त्यावरील तारीख खोडून २०१४ मधील तारीख टाकून नोटरी केल्याचेही उघड झाले. यात पोलिसांनी या रॅकेटला बनावट रबरी शिक्के तयार करून देणाऱ्याला पकडले. सय्यदसाब महेबूब दारुवाले असे त्याचे नाव आहे. ‘एमएच १२’ नावाचे त्याचे शॉप होते. त्याठिकाणी त्याने पैसे घेऊन जागा बळकावणाऱ्या रॅकेटमधील लोकांना वकिलांचे बनावट शिक्के तयार करून दिले, ही बाब तपासात उघड झाली.

....

महापालिका यंत्रणेतून संशयास्पद काम

जागा बळकावणाऱ्यांनी त्यांच्या बनावट नोटरीवर सर्रास वैभव डी. कुलकर्णी, एच. एल. खान, एल. पी. देशपांडे व गणेश शिंदे यांचे वकील म्हणून शिक्के मारले आहेत. वास्तविक पाहता हे लोक वकील नसल्याचे कोषागार कार्यालयानेही स्पष्ट केल्याचे पोलिसांनी सांगितले. महापालिकेतील यंत्रणा कागदपत्रांची कोणतीही खात्री न करता नोटरी कब्जा पावतीवरून सहजपणे नोंदी लावत असल्याने हे रॅकेट अजूनही सक्रिय असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

रॅकेटच्या रडारवर ‘ही’ ५२ नगरे

सत्यसाई नगर, महालक्ष्मी नगर, शिवपार्वती नगर, राजीव गांधी नगर, कस्तुरबा नगर, सत्यसाई नगर, मित्र नगर, विजय नगर, भारतमाता नगर, सिद्धेश्वर नगर, विजय नगर, विजयलक्ष्मी नगर, लक्ष्मी नगर, चंद्रकला नगर, अंबिका नगर, दीक्षित नगर (१, २, ३ व ४), बालाजी नगर, विनायक नगर, न्यू सुनील नगर, अभिषेक नगर, गणेश नगर, साई नगर, कृष्णवेणी नगर, केतकी नगर, येमूलवाडा, बापूजी नगर, श्रीमान नगर, भीमाशंकर नगर, गुरुदेवदत्त नगर, भाग्यलक्ष्मी नगर, अनिता नगर, संगमेश्वर नगर (एक, दोन), ललिता नगर, सरवदे नगर, भीम नगर, साई नगर (अ, ब, क), कीर्ती नगर, कलावती नगर, वैष्णवी नगर, शिवलिंग नगर या नगरांमधील सर्वाधिक जागांवर नोटरीद्वारे कब्जा केल्याचे एमआयडीसी पोलिसांना तपासात आढळले आहे. याशिवाय विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील पापाराम नगर, मजरेवाडीतील जागांचाही यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.