कांद्याच्या दरासाठी स्वाभिमानीचा '' शिमगा '', प्रतिक्विंटल तीन हजार रुपये देण्याची मागणी ''

कांद्याच्या दरासाठी स्वाभिमानीचा '' शिमगा '', प्रतिक्विंटल तीन हजार रुपये देण्याची मागणी ''

Published on

SLC26B28315, SLC26B28316
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (छायाचित्र ः प्रमोद हिप्परगी)

कांद्याच्या दरासाठी स्वाभिमानीचा ‘शिमगा’
प्रतिक्विंटल तीन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

उ. सोलापूर, ता. ३ ः कवडीमोल दराने विकला जात असलेल्या कांद्याच्या दरासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न समितीच्या आवारात सरकारच्या धोरणाच्या विरोधात यावेळी बोंबाबोंब करण्यात आली. यावेळी संघटनेच्या वतीने कांद्याला तत्काळ अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.

सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा आवारात सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी सरकारच्या नावाने आंदोलकांनी बोंब मारली. यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सरकारच्या धोरणामुळेच कांदा उत्पादक देशोधडीला लागला असल्याचा आरोप केला. गेल्या तीन वर्षांत कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला असून, सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी केली.
कांदा उत्पादनाला प्रतिक्विंटल दोन ते अडीच हजार रुपये इतका खर्च येत असून, हातात फक्त सहाशे ते सातशे रुपये मिळत आहेत. यामुळे सरकारने कांद्याला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांनी कमी दारात विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी केली. यानंतर संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन बाजार समिती प्रशासनाला देण्यात आले. यावेळी इकबाल मुजावर, मोहसीन पटेल, दिनेश शिंदे, प्रताप गायकवाड,किरण पाटील, महादेव शिंदे, सचिन मस्के या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींचा शेतकरी बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com