कारखानदारांच्या गैरकारभारात साखर कार्यालय सामील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप '' स्थितीत उसाच्या बिलासाठी संघटनेकडून कार्यालयात ठिय्या आंदोलन

कारखानदारांच्या गैरकारभारात साखर कार्यालय सामील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप '' स्थितीत उसाच्या बिलासाठी संघटनेकडून कार्यालयात ठिय्या आंदोलन

Published on

SLC26B28291
सोलापूर : येथील प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयात उसाच्या बिलासाठी आंदोलन करताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.

कारखानदारांच्या गैरकारभारात साखर कार्यालय सहभागी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप; उसाच्या बिलासाठी ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
उ.सोलापूर, ता. २७ : जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून सुरू असलेल्या लुटीत साखर कार्यालय सामील असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. शुक्रवारी उसाच्या थकीत रकमेसाठी संघटनेच्या वतीने सोलापूर येथील साखर कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रादेशिक सहसंचालक अनुपस्थित राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकीत ५०० कोटी रुपयांच्या उसाच्या बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. शहरातील प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयात संघटनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पूर्वसूचना देऊनही सहसंचालक प्रकाश अष्टेकर अनुपस्थित राहिल्यामुळे संघटनेच्या नेत्यांनी रोष व्यक्त केला. आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले, सहसंचालकांचे कार्यालय कारखानदारांच्या भ्रष्ट कारभाराला सहकार्य करत आहे. अधिकारी बोटचेपी भूमिका घेत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी आंदोलनाच्या वेळी सहसंचालकांची अनुपस्थिती शेतकऱ्यांची चेष्टा करणारी असल्याचे सांगितले. यावेळी प्रादेशिक उपसंचालक जे. पी. गावडे यांनी एफआरपी वसुलीबाबत तत्काळ कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी मोहसीन पटेल, इक्बाल मुजावर, रजाक मकानदार, दिनेश शिंदे, महादेव शिंदे, राहुल मोरे, नासिर पटेल, तुकाराम शेतसंदी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

चौकट
‘गोकूळ’ चालू कसा?
यावेळी जिल्हाध्यक्ष रणदिवे यांच्याशी साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी संपर्क साधला. अधिवेशनातील कामकाजामुळे आपण अनुपस्थित राहिल्याची माहिती अष्टेकर यांनी दिली. यावेळी रणदिवे यांनी गतवर्षीची उसाची रक्कम थकीत असतानाही ‘गोकूळ शुगर’ हा कारखाना यावर्षी गाळप कसा करू शकला, याबाबत प्रश्न उपस्थित केला. साखर कार्यालयाच्या सहकार्याशिवाय कारखानदार असे धाडस कसे करू शकतात, असा सवालही रणदिवे यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com