गणेशोत्सवापूर्वी बुधवारी ‘शांतता’ बैठक

गणेशोत्सवापूर्वी बुधवारी ‘शांतता’ बैठक
Published on

गणेशोत्सवासाठी बुधवारी ‘शांतता’ बैठक

पोलिस आयुक्तालयाकडून मंडळांना निरोप; ‘डीजे’च्या आवाजाची ठरणार मर्यादा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० : शहरात गतवर्षी ११८० गणेशोत्सव मंडळांनी उत्सवात सहभाग घेतला होता. यंदाही अकराशे मंडळे गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. यंदाचा गणेशोत्सव शांततेत व गतवर्षीप्रमाणे डीजेमुक्त व्हावा, यासाठी बुधवारी (ता. २) पोलिस आयुक्तालयात शांतता समितीची व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
मागच्या वर्षी सोलापूर शहरातील गणेशोत्सव डीजेमुक्त झाला होता. यंदाचा गणेशोत्सव पारंपारिक वाद्याच्या गजरात साजरा व्हावा, यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न राहणार आहेत. मागील गणेशोत्सवात पारंपारिक वाद्याच्या गजरात निघालेल्या मिरवणुका पहायला महिला, लहान मुलांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी लेझिम, झांज पथक, टिपऱ्या असे पारंपारिक वाद्य पहयला मिळाले. यंदाही मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांनी लेझिमची तयारी सुरू केली आहे. आगमन व विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मंडळाने डीजे किंवा मोठ्या आवाजाचे साऊंड लावू नयेत, यासाठी पोलिस आयुक्त एम. राजकुमार हे सूचना देणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वांना उत्सव काळात आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे. या बैठकीसाठी शहरातील नऊ मध्यवर्ती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापालिका, महावितरण, आरटीओ, धर्मादाय आयुक्तांचे अधिकारीही उपस्थित असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com