

PNE26W50697 - जोडभावी पेठेतील श्री विष्णु क्रीडा मंडळाने साकारलेला राजस्थानातील खाटू श्याम मंदिराचा देखावा
PNE26W50696 - नेताजी तरूण मंडळाचा तिरूमला तिरूपती येथील व्यंकटेश बालाजी मंदिराचा देखावा
PNE26W50724 - दशभुजा गणपती मंडळाचा नारळातील गणेश देखावा
PNE26W50770 - गोकुळ प्रतिष्ठान श्रीमंत लष्कराचा लाडका राजा या मंडळाने कलकत्ता येथील दुर्गामाता देवी मंदिराचा केलेला देखावा
देखाव्यातून का होईना, खाटू श्याम, तिरुपती बालाजी, दुर्गा अन् गंगाअवताराचे दर्शन
सोलापुरातील गणेशोत्सव मंडळांनी साकारले विविध धार्मिक देखावे; काही मंडळांचे काम अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता.१७ : शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेल्या धार्मिक, सामाजिक देखाव्यांमधून भाविकांना वेगवेगळ्या देवस्थानांचे दर्शन घडत आहे. शहरातील अनेक मंडळांचे देखावे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तयार झालेले देखावे पाहण्यासाठी गौरी आगमनाचा दिवस असतानाही गुरुवारी मंडळांसमोर देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
नेताजीनगर तरुण मंडळाने तिरुपती बालाजी मंदिराचा, तर जोडभावी पेठेतील श्री विष्णु क्रीडा मंडळाने राजस्थान येथील श्री खाटू श्याम बाबा मंदिराचा देखावा उभारला आहे. लकी चौकातील श्री समर्थ तरुण मंडळाने श्रीकृष्ण रासलीलेचा, बाळीवेस येथील कसबा गणपती मंडळाने गंगा अवताराचा, पूर्व विभागातील अप्पा गणपती मंडळाने काशी विश्वनाथ मंदिराचा, तर जुळे सोलापूरच्या प्रारंभ प्रतिष्ठानने गणेश आरती व गणेश स्तोत्राचा देखावा सादर केला आहे.
------------------
दशभुजा मंडळाचा नारळातील गणपती देखावा
दशभुजा मंडळ - स्थळ ः तरटी नाका पोलीस चौकी- देखावा ः नारळातील गणपती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.