

PNE26W49230
सोलापूर : सोडतीप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आदी.
----
२४ वर्षांनंतर साकारले पत्रकारांच्या घराचे स्वप्न
म्हाडा अंतर्गत २३८ सदनिकांची सोडत; नव्या वर्षात घरांचा ताबा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : दोन तपांहून अधिक काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने शनिवारी महत्त्वाचे पाऊल पडले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) उपविभाग सोलापूर अंतर्गत सी.एस. क्र. २३२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेत बांधण्यात आलेल्या २३८ सदनिकांची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये १२६ अत्यल्प उत्पन्न गट आणि ११२ अल्प उत्पन्न गटातील सदनिकांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, उपमुख्य अधिकारी पुणे मंडळ राहुल शिळीमकर, प्र कार्यकारी अभियंता पुणे मंडळ मिलिंद अटकळे, मिळकत व्यवस्थापक रूपेश जयभाये, सोलापूर उपविभागाचे सूरज अजनाळकर, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख आदी उपस्थित होते.
आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार संघटनांनी तब्बल २४ वर्षे केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जागा निश्चित होऊन भूमिपूजन झाल्याचे सांगत, पत्रकारांना घरे मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सोडत प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच गुढीपाडव्यापूर्वी पत्रकारांच्या हातात घरांची चावी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी, पत्रकारांच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करत सदनिकांची किंमत आणखी कमी करण्यासाठी शासन, सीएसआर आणि इतर माध्यमांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पत्रकारांसाठीचा हा प्रकल्प देशातील पहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीतील आठवणी सांगत, बाह्य सुविधांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे सांगितले.
श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी म्हाडाचे सोमनाथ रावळे, गोरक्षनाथ कुलट, बालकृष्ण दावनपल्ली, प्रमोद शिंदे, सतीश लष्करे, हरिदास देशमुख, सुमीत उबाळे, वर्षा घोरपडे, सुनीता गोडसे यांच्यासह म्हाडाचे अधिकारी तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.