श्री श्रीदेवी भुदेवी समेत श्री वेंकटेश्वर स्वामी दिव्य कल्याणोत्सवम्

श्री श्रीदेवी भुदेवी समेत श्री वेंकटेश्वर स्वामी दिव्य कल्याणोत्सवम्
Published on

PNE26W46564 - सोलापूर : माता श्रीदेवी, भूदेवी व श्री व्यंकटेश्वरांच्या कल्याणोत्सवात मंत्रोच्चार करताना तिरुपती येथील प्रधान अर्चक व सहकारी.
PNE26W46563 - सोलापूर : श्री व्यंकटेश्वरांच्या कल्याणोत्सवासाठी उपस्थित भक्तगण व कल्याणकर्ते (यजमान).

दोन हजार भक्तांच्या साक्षीने श्रीदेवी-भूदेवी-वेंकटेश्वरांचा कल्याणोत्सव
व्यंकटेश्वर देवस्थानात तिरुमला उत्सवाची प्रचिती; सुदर्शन यज्ञ, पालखी प्रदक्षिणेने पूर्व भाग भक्तिमय

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ : तिरुमला तिरुपतीच्या धर्तीवर सजलेले देवस्थान, फुलांनी नटलेला कल्याण मंडप, वेदमंत्रांचा घोष आणि दाक्षिणात्य मंगलवाद्यांचा निनाद अशा भक्तिमय वातावरणात श्रीदेवी-भूदेवीसमेत श्री वेंकटेश्वर स्वामींचा दिव्य कल्याणोत्सव दोन हजार भाविकांच्या साक्षीने पार पडला. उत्सवमूर्तींची पालखी प्रदक्षिणा आणि तिरुमला येथील वेदपंडितांच्या मंत्रोच्चाराने पूर्व भागातील श्री वेंकटेश्वर देवस्थानाला तिरुमलाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मंगळवारी (ता. १) झालेल्या या सोहळ्यास कल्याणकर्ते (यजमान) तसेच भाविकांची मोठी गर्दी झाली. रात्री नऊ वाजता भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मंदिर समितीचे अध्यक्ष रायलिंग आडम, श्रीनिवास बोद्धुल, व्यंकटेश चिलका, राजेशम येमुल, गोविंद बुरा, श्रीनिवास गाली, व्यवस्थापक राजदिगंबर रापेल्ली, अशोक चिन्नी तसेच श्रींचे पालखी सेवक उपस्थित होते.
---------------------
सुदर्शन यज्ञाने पवित्रोत्सवाला रंग
मंगळवारी सकाळी सहा वाजता श्रींच्या उत्सवमूर्तींचा अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता तिरुमला तिरुपती देवस्थानहून आलेल्या ब्रह्मवृंदांच्या हस्ते श्री सुदर्शन यज्ञ व होमहवन शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. यावेळी अभिषेककर्ते व होमहवनकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
---------------------
धार्मिक विधींनी पवित्रोत्सवाला सुरुवात
शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ६.३० वाजता अंकुरारोपणम्, भगवत प्रार्थना, अनुज्ञा, विश्वक्सेना आराधना, पुण्याहवाचन, ऋत्विक वरणम्, रक्षाबंधनम्, वास्तुपूजा, मृत्संग्रहणम् आणि यज्ञशाला प्रवेशम् आदी विधींनी पवित्रोत्सवाला सुरुवात झाली. पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता होमहवन व स्वागत समारंभ (येदुरुकोल्लू) झाल्यानंतर उत्सवमूर्तींना आकर्षक सजावट करण्यात आली. पालखीतून मंदिर प्रदक्षिणा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या कल्याण मंडपात तिरुमला येथून आलेले वेदपंडित श्री. रामशेषु स्वामी यांच्या वेदमंत्रोच्चारात श्रीदेवी-भूदेवीसमेत श्री वेंकटेश्वर स्वामींचा दिव्य कल्याणोत्सव विधीवत पार पडला. दाक्षिणात्य मंगलवाद्यांच्या निनादाने सोहळ्याचे वातावरण अधिकच मंगलमय झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com