दक्षिण सोलापूर, अक्कलकोट च्या पाणीप्रश्नासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : आमदार यशवंतराय गौडा पाटील

दक्षिण सोलापूर, अक्कलकोट च्या पाणीप्रश्नासाठी  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : आमदार यशवंतराय गौडा पाटील
Published on: 

URA26A00619
बिरूर (ता. द. सोलापूर) ः गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना यशवंतराव गौडा-पाटील व अन्य.

दक्षिण सोलापूरच्या पाणीप्रश्नासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
बरूर येथील सत्कार सोहळ्यात आमदार यशवंतराय गौडा पाटील यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
दक्षिण सोलापूर, ता. १४ : सीमाभागासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रलंबित पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये असली तरी आपण सर्वजण बंधुभावाने एकत्र राहू, अशी ग्वाही इंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंतराय गौडा-पाटील यांनी दिली.

बरूर (ता. द. सोलापूर) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सुभाष शेळके यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. चनगोंडा हविनाळे होते.
प्रास्ताविकात सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मांडला. तालुक्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी आमदार पाटील यांनी कर्नाटक सरकारशी चर्चा करून हा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त सुभाष शेळके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आभार प्राचार्य सुनील हविनाळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.