शहरात दहा दिवसांत पाच दुचाकींची चोरी

शहरात दहा दिवसांत पाच दुचाकींची चोरी
Published on: 

बाजारपेठेतील गर्दीच्या परिसरात
चोरट्यांनी पळवल्या पाच दुचाकी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठेत झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पाच दुचाकी चोरून नेल्या. यातील तीन चोऱ्या सरस्वती चौक परिसरात एकाच दिवशी घडल्या. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. रेल्वे स्थानक परिसर आणि तनिष्क नगर येथूनही प्रत्येकी एक दुचाकी चोरीला गेली आहे.
रवी मोहन पसुल (रा. विडी घरकुल), तानाजी शिवाजी चव्हाण (रा. तळे हिप्परगा) आणि म. युसूफ इब्राहिम चौधरी (रा. सिमला नगर) यांनी आपल्या दुचाकी लॉक करून सरस्वती चौक परिसरात लावल्या होत्या. दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी या दुचाकी चोरून नेल्या. त्यांची किंमत अनुक्रमे आठ हजार, ६० हजार आणि ७० हजार रुपये असून त्यांचे क्रमांक एमएच १३ डीडी ४०३७, एमएच १३ बीए ९२४७ आणि एमएच १३ एडी ९१८७ असे आहेत. या तिघांनीही फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, अमित अशोक फंड (रा. आदित्य नगर, विजयपूर नाका) यांनी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.२० वाजता ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १३ डीएच ७२२९) रेल्वे स्थानकाजवळ लावली होती. तिचे लॉक तोडून चोरट्याने ती पळवली. या प्रकरणी त्यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सुहास सुरेश उजळंबे (रा. पूर्व मंगळवार पेठ) यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी तनिष्क नगरातून चोरीला गेली. त्यांनी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दुचाकी (एमएच १३ एजी ६०२९) लॉक करून लावली होती. या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.