अनेक पुढाऱ्यांनी महापालिकेच्या मालमत्ता लाटल्या

अनेक पुढाऱ्यांनी महापालिकेच्या मालमत्ता लाटल्या
Published on

अनेक पुढाऱ्यांनी महापालिकेच्या मालमत्ता लाटल्या

महापौर विनायक कोंड्याल यांचा आरोप; परत घेण्याची प्रक्रिया सुरू करणार, नागरी हिताला प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : महापालिकेच्या मालकीच्या मालमत्ता या नागरिकांची सार्वजनिक संपत्ती असून, अनेक मालमत्तांचा यापूर्वी योग्य वापर झाला नाही. काही मालमत्ता पुढाऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी वापरल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचा पुन्हा ताबा घेऊन त्यांचा नियोजनबद्ध वापर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेच्या मालमत्तांचा विकास करताना नागरिकांचे हित, शहराच्या भविष्यातील गरजा आणि मंजूर विकास आराखड्यातील तरतुदी यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे महापौर मंडळ यांनी स्पष्ट केले. यापूर्वी राबविण्यात आलेले बीओटी प्रकल्प अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाले नाहीत, हे मान्य करत यापुढे अशा प्रकल्पांपेक्षा शहराच्या गरजा आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या मालकीच्या जागा आणि इमारतींचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. शासनाने जुलै २०२६ मध्ये निश्चित केलेल्या धोरणानुसारच मालमत्ता मुद्रीकरणाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून महापालिकेला शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.


उत्पन्नाचा उपयोग शहर विकासासाठी
या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग शहराच्या विकासासाठी करण्यात येणार असून, विशेषतः सोलापूरच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेला आर्थिक बळ देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्तांचा केवळ व्यावसायिक वापर न करता त्यातून शहराच्या विकासाला दीर्घकालीन फायदा कसा होईल, याचा विचार केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com