सोलापूरच्या कांद्यापट्ट्यातील १५०० कोटीची उलाढाल झाली ठप्प,२०० कोटी रुपयांचा रोजगार बुडाला,, पाण्याअभावी रोपवाटिका विकण्याची आली शेतकऱ्यांवर वेळ ''

सोलापूरच्या कांद्यापट्ट्यातील  १५०० कोटीची उलाढाल झाली ठप्प,२०० कोटी रुपयांचा रोजगार बुडाला,, पाण्याअभावी रोपवाटिका विकण्याची आली शेतकऱ्यांवर वेळ  ''
Published on: 

जिल्हा टुडे एक मेन
------------------
SLC26B30266
उत्तर सोलापूर : कित्येक शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याअभावी कांदा रोपवाटिका विकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातून उजनी लाभक्षेत्रात शेतकरी कांद्याचे रोप घेऊन जातानाचे दृश्य.

SLC26B30267
उत्तर सोलापूर : पाण्याअभावी कित्येक शेतकऱ्यांची कांद्याची रोपे लागवडीअभावी वाफ्यात जळून जात आहेत.

दुष्काळाचा कांदापट्ट्याला १,५०० कोटींचा फटका!
जिल्ह्यातील २०० कोटींचा रोजगार बुडाला; पाण्याअभावी लागवडीत मोठी प्रमाणात घट

संदीप गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
उत्तर सोलापूर, ता. १९ : खरीप कांदा उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या कांदापट्ट्यात यंदा दुष्काळामुळे अर्थकारणाचा गाडा ठप्प झाला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, लागवड घटल्याने अंदाजे १,५०० कोटी रुपयांचा फटका यंदा कांदापट्ट्याला बसला आहे. शेतकऱ्यांसह महिला मजूर, वाहतूकदार, वाहनचालक आणि बारदाना उत्पादक अशा अनेक घटकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कांदा लागवड, खुरपणी आणि काढणी या कामांतून मिळणारा सुमारे २०० कोटी रुपयांचा रोजगारही बुडाला आहे.

सोलापूर जिल्हा खरीप आणि रब्बी हंगामातील कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा विक्रीसाठी देशातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असून, दक्षिण आणि उत्तर भारतासाठीचे महत्त्वाचे विक्री केंद्र म्हणून ओळखली जाते. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, माढा आणि मोहोळ हे तालुके कांदा उत्पादनात अग्रेसर आहेत. या भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे. कांद्याला समाधानकारक दर मिळाल्यास या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळते.

यंदा मात्र दुष्काळामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. पाणी उपलब्ध नसल्याने लागवडीसाठी तयार केलेली कांद्याची रोपे शेतातच पडून आहेत. काही ठिकाणी रोपे जळून जात आहेत, तर काही शेतकरी ती मातीमोल दराने विकत आहेत किंवा मोफत दिली जात आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर तर रोपवाटिका विकण्याची वेळ आली आहे.

चौकट...
महिला मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार बुडाला
कांदा लागवड घटल्याचा फटका शेतमजुरांसह अन्य व्यावसायिकांनाही बसला आहे. कांदा लागवडीच्या हंगामात महिला मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. त्यानंतर खुरपणी आणि काढणीच्या कामांतूनही रोजगार उपलब्ध होतो. काढणीनंतर कांद्याची बाजारपेठेपर्यंत वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या हंगामात मोठा व्यवसाय मिळतो. मात्र, यंदा लागवडच घटल्याने या संपूर्ण यंत्रणेचे अर्थकारण कोलमडले आहे.

चौकट
जिल्ह्यातील कांदा लागवडीची स्थिती
- गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात सुमारे ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर अर्ली रब्बी कांद्याची लागवड झाली होती.
- नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान आणखी ३४ हजार ४०४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी कांद्याची लागवड झाली.
- दोन्ही हंगामांत मिळून जवळपास ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली होती. हा विक्रम होता.
- यंदा आतापर्यंत केवळ १६ हजार ७६८ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाल्याची नोंद आहे. या क्षेत्रातील कांदा उत्पादनावरही पाणीटंचाईचे सावट आहे.

चौकट
एका एकरातून ३० ते ३५ हजारांचा रोजगार
- कांदा लागवडीसाठी एकरी ९ ते १० हजार रुपये मजुरी द्यावी लागते.
- खुरपणीसाठी एकरी सुमारे १० हजार रुपये, तर काढणीसाठी जवळपास १५ हजार रुपये खर्च येतो.
- लागवड, खुरपणी आणि काढणीच्या कामांतून एका एकरात ३० ते ३५ हजार रुपयांचा रोजगार निर्माण होतो. यंदा कांदा लागवड घटल्याने सुमारे २०० कोटी रुपयांचा रोजगार बुडाला आहे.

कोट
“विहीर तळाला गेली. कांद्याच्या रोपांनाही पाणी पुरेना. त्यामुळे रोपे इंदापूर येथील नातलगाला देऊन टाकली. मी दरवर्षी जवळपास नऊ एकरांवर कांदा करतो. माझ्या कुटुंबाचे वर्षभराचे अर्थकारण कांद्यावरच चालते. यंदा मात्र संपूर्ण मळा काळा पडला आहे.”
- तानाजी यादव, कांदा उत्पादक शेतकरी, अकोलेकाटी, उत्तर सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com