सोलापूर-बाजारआढावा

सोलापूर-बाजारआढावा
Published on

सोलापूर कांद्याला प्रतिक्‍विंटलला सर्वाधिक ३,६०० रुपये

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात किंचित चढ-उतार पाहायला मिळत होते; मात्र, या सप्ताहात कांद्याच्या दरात काहीशी वाढ झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३६०० रुपयांचा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सध्या सोलापूर बाजारात स्थानिक भागातून होणारी कांद्याची आवक कमीच असून, बाहेरील जिल्ह्यांतून होणाऱ्या कांद्याची आवक तुलनेने जास्त राहिली आहे. बाजार समितीत दररोज सरासरी १०० ते १५० गाड्यांपर्यंत कांद्याची आवक नोंदवली जात आहे. चालू सप्ताहात कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी १,९०० रुपये तर उत्कृष्ट दर्जाच्या कांद्याला सर्वाधिक ३,६०० रुपये असा दर मिळाला आहे. बाजारात कांद्याची आवक अशीच मर्यादित राहिल्यास येत्या दिवसांतही हे दर टिकून राहतील, अशी शक्यता बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com