शिवसेना शिंदे पक्ष वार्तापत्र

शिवसेना शिंदे पक्ष वार्तापत्र

Published on

धनुष्यबाणाची ''मर्यादित'' झेप
सोलापुरात युतीची समीकरणे विखुरली

​सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : महापालिका निवडणुकीच्या रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी केलेली हातमिळवणी करिष्मा दाखवू शकली नाही. राज्याच्या सत्तेतील दोन मोठे वाटेकरी एकत्र येऊनही शिंदेसेनेला अपेक्षित यशाने हुलकावणी दिली आहे. ६१ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या या युतीला केवळ ४ जागांवर विजय मिळवता आला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात आता या ''मैत्री''च्या परिणामांची चर्चा सुरू झाली आहे.

​युतीचे गणित क्रॉस वोटिंगमध्ये अडकले
​जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या पॅनेलने तीन जागा जिंकून आपले अस्तित्व शाबूत राखले, तर युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी प्रभाग १६ मधून विजय खेचून आणला. मात्र, राष्ट्रवादीच्या साथीने शहरात मोठे सत्तापालट करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदेसेनेला मतदारांनी मर्यादित यशात रोखले. अनेक प्रभागांत ''क्रॉस वोटिंग'' झाल्याचा थेट फटका बसला असून, आयत्या वेळी युतीत सामील झालेल्या उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौकट...
प्रभाग क्रमांक सातचा दे धक्का पॅटर्न
​निकालात प्रभाग ७ मधील विजय हा शिंदेसेनेसाठी मोठा ''बूस्टर'' ठरला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात मिळवलेला हा विजय युतीसाठी सुखावणारा असला, तरी इतर प्रभागांत मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांचा अभाव आणि राज्य स्तरावरील नेत्यांच्या प्रचाराची उणीव प्रकर्षाने जाणवली. १० ते १२ जागांवर युतीचे उमेदवार अतिशय अल्प फरकाने पराभूत झाले, जिथे थोड्या ताकदीची गरज होती.

चौकट...
आत्मचिंतनाचे आव्हान
अजितदादांच्या राष्ट्रवादीची साथ असूनही ''मॅजिक फिगर'' गाठता न आल्याने दोन्ही पक्षांना आता आत्मचिंतन करावे लागणार आहे. संघटनात्मक बांधणी व कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढवणे हे येणाऱ्या काळातील सर्वात मोठे आव्हान असेल. निवडणुकीनंतर आता ही युती महापालिकेत भाजपशी जुळवून घेते की आपला स्वतंत्र गट कायम राखते?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपेक्षित यश लांब असले तरी, या ४ जागांच्या बळावर शिंदेसेना सोलापुरात आपली नवी राजकीय इनिंग सुरू करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com