माझा प्रस्ताव का चोरला? नगरसेवक म्हणाले आम्ही फक्त सही केली

माझा प्रस्ताव का चोरला? नगरसेवक म्हणाले आम्ही फक्त सही केली
Published on

माझा प्रस्ताव का चोरला? नगरसेवक म्हणाले आम्ही फक्त सह्या केल्या

श्रद्धा पवारांनी विचारला महापौरांना प्रश्‍न; पक्षाच्या बैठकीत विषयांवर गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : भाजपच्या नगरसेविका श्रद्धा पवार यांनी महिनाभरापूर्वी चार विषयांचा प्रस्ताव दिला. चारही विषय अजेंड्यावर घेतले नाही. याउलट त्यांच्या विषयाचा प्रस्ताव इतर नगरसेवकांची नावे टाकून अजेंड्यावर घेण्यात आला. त्यामुळे माझा प्रस्ताव का चोरला? असा प्रश्‍न महापौरांना विचारला. संबंधित नगरसेवकांनी आम्ही फक्त सही केल्याची कबुली दिली. त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ सुरू झाला.
महापालिकेच्या २० मे रोजी महासभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेत पक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रस्ताव चोरण्यावरून मोठा गदारोळ भाजपच्या नगरसेवकांमध्ये झाला. प्रभाग सातच्या भाजपच्या नगरसेविका श्रद्धा पवार यांनी महिनाभरापूर्वीच चार विषय सभागृहनेत्यांकडे व नगरसचिवांकडे दिले होते. त्यांच्या नावाचा एकही प्रस्ताव अजेंड्यावर घेतला गेला नाही. मात्र, त्यांनी दिलेल्या विषयांपैकी शहरातील नागरी आरोग्य केंद्राचा विषय इतर नगरसेवकांच्या नावाने अजेंड्यावर घेण्यात आला. यावर भडकलेल्या श्रद्धा पवार यांनी इतर नगरसेवकांनी माझा प्रस्ताव का चोरला? एखाद्या विषयाचा अभ्यास मी करणार, त्याची माहिती मी घेणार, त्यासाठी मी माझा वेळ देणार आणि मी दिलेला प्रस्ताव इतर नगरसेवकांच्या नावे अजेंड्यावर येणार? माझा प्रस्ताव का चोरलात? अशी विचारणा पवार यांनी बैठकीत केली. प्रस्तावाला संबंधितांची नावे असलेल्या नगरसेवकांनी तर आम्ही फक्त सह्या केल्या, आम्हाला विषय माहिती नसल्याचे आश्चर्चकारक उत्तर दिले. यावर पवार यांनी महापौरांना प्रश्‍न विचारत शहराध्यक्षांनाही वेठीस धरले. प्रस्ताव चोरीच्या अशा या पहिल्याच प्रकारामुळे सभागृहात गोंधळ उडाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com