

२९८८०
सोलापूर : पावसाने हजेरी लावल्यानंतर छत्री घेऊन जाताना मुले.
---
रिमझिम पावसाने उकाडा झाला गायब
मोठ्या पावसाची अपेक्षा कायम; आर्द्रता पोचली ७६ टक्क्यांवर
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : पावसाळा सुरू झाला तरीही उकाडा वाढलेलाच होता. आज सोलापुरात आर्द्रता ७६ टक्के असल्याने दुपारपर्यंत प्रचंड उकाडा होता. दुपारी ४ च्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस साधारणतः अर्धा तास राहिला. रिमझिम पावसाच्या हजेरीने वातावरण बदलून टाकले. उन्हाळ्यात असल्यासारख्या वाटणाऱ्या सोलापूरला या पावसाने काही काळापुरता का होईना, पावसाळ्याचा अनुभव दिला. सायंकाळच्या सुमारास सोलापुरात अल्हाददायक वातावरण झाले होते.
पावसाळ्यातील मृग नक्षत्र संपले, आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होऊन चार दिवस झाले तरीही दमदार पाऊस हजेरी लावत नसल्याने दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहे. बुधवारी सोलापुरात ४५ टक्क्यांवर असलेली आर्द्रता आज ७६ टक्क्यांवर पोचली होती. बुधवारी कमाल तापमान ३५.७ अंश होते. आज सोलापूरच्या तापमानात घट झाली होती. आज सोलापुरात ३४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका कमी झाला असला तरीही दुपारपर्यंत वातावरणात प्रचंड उकाडा होता.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळच्या सुमारास दिलासा मिळाला. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण व पावसाची रिमझिम सुरूच होती. सोलापूर शहर व परिसरात २८ जूनपर्यंत वाऱ्याचा वेग वाढेल. या काळात ढगाळ वातावरण राहील व पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस व करमाळा तालुके वगळता सर्वच तालुक्यांत आतापर्यंत ५० मिलिमीटरच्या आतच पाऊस झालेला आहे. जून संपत आला तरीही जिल्हाभर दमदार पाऊस नसल्याने यंदाच्या दुष्काळाची भीती व्यक्त होऊ लागली आहे. पावसाळा सुरू झाला तरीही वातावरणातील धग मात्र अद्यापही कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.