

Unsafe Road Excavation Work on Solapur Road
Sakal
हडपसर : पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत शहरातील सुमारे साडेपाचशे किलोमीटरच्या रस्त्यांवर डक्ट व चेंबर टाकण्याचे काम केले जात आहे. सध्या हे काम हडपसर परिसरात ऐन वर्दळीच्या वेळेत सुरू असून या कामाबाबत कोणतीही सूचना व सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत असलेल्या पालिका प्रशासना विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.