

वास्तव वेध
प्रभाग ८
टिपः फोटोसाठी जागा ठेवावी.
फोटोओळ :
सोलापूर : समाचार चौकात विद्युत रोषणाईने उजळलेले आकर्षक फाउंटन.
समाचार चौकाचा फाउंटनने कायापालट
अस्वच्छतेचे चित्र पालटले; स्वच्छता अन् सौंदर्यीकरणाच्या कामांना वेग
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या समाचार चौकाला आता फाउंटनमुळे नवे सौंदर्य प्राप्त झाले आहे. वर्षानुवर्षे कचरा, घाण आणि अतिक्रमणांच्या विळख्यात असलेल्या या चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. भव्य फाउंटन, आकर्षक विद्युत रोषणाई आणि संगमरवरी कामामुळे चौकाचे रूप पालटले आहे.
समाचार चौक परिसरात अनेक वर्षांपासून अस्वच्छतेची समस्या होती. ठिकठिकाणी कचरा साचत होता, तर अतिक्रमणांमुळे परिसराचे विद्रूप चित्र निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेत सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यातून चौकात भव्य फाउंटन उभारण्यात आले आहे.
या कामासाठी राजस्थानमधील कारागिरांची मदत घेण्यात आली. फाउंटनमध्ये संगमरवरी काम करण्यात आले असून, विद्युत रोषणाईमुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. आतील भागात कारंजे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, प्रभाग क्रमांक आठमध्ये स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाची अन्य कामेही हाती घेण्याचे नियोजन नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.
-------------------
कोट
समाचार चौकाच्या सुशोभीकरणामुळे त्याला अधिक देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून हे काम झाले. आगामी काळात प्रभागात अशाच प्रकारची विकासकामे करण्याचा विचार आहे.
— अमर पुदाले, नगरसेवक, प्रभाग क्रमांक ८
-------------------
समाचार चौकाच्या सुशोभीकरणासोबतच गावठाण भागातील स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे परिसर अधिक स्वच्छ राहण्यास मदत होईल. गड्डा यात्रेपूर्वी आणखी काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
— गीता गवई, नगरसेवक, प्रभाग क्रमांक ८
-------------------
स्वच्छता हाच आमचा प्राधान्यक्रम आहे. कोणत्याही परिस्थितीत परिसरात अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.
— बबिता धुम्मा, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.