

सोलापूर विभागातील ५२
एसटी बस होणार स्क्रॅप
ताफ्यात ४५ नवीन ‘जिजाऊ’ बस दाखल
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : राज्यातील एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी महामंडळाने अत्यंत जुन्या आणि भंगार झालेल्या बस सेवेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन महिन्यांत राज्यभरातील तब्बल ५ हजार जुन्या बस भंगारात (स्क्रॅप) काढल्या जाणार आहेत. या राज्यस्तरीय निर्णयाचा भाग म्हणून सोलापूर एसटी विभागातील कालबाह्य झालेल्या ५२ जुन्या बस सप्टेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत टप्प्या- टप्प्याने भंगारात काढण्यात येणार आहेत.
दुसरीकडे, सोलापूर विभागाला आतापर्यंत ४५ नवीन अत्याधुनिक ‘जिजाऊ’ बस प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे.
---
सुरक्षितता अन् नवीन बसची गरज
दीर्घकाळ सेवेत राहिलेल्या जुन्या बसची दुरवस्था झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि रोजचे प्रवासी यांच्यासाठी एसटी हीच मुख्य जीवनवाहिनी आहे. सोलापूर विभागातील ५२ जुन्या बस टप्प्या-टप्प्याने कमी होत असताना ४५ नवीन ‘जिजाऊ’ बस ताफ्यात दाखल झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आगामी काळात स्क्रॅप होणाऱ्या बसच्या प्रमाणात आणखी नवीन बस सोलापूर विभागाला उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होईल.
---
महिनानिहाय ५२ बस स्क्रॅप करण्याचे नियोजन
महिना व वर्ष - स्क्रॅप होणाऱ्या बस
सप्टेंबर २०२६ - ३
ऑक्टोबर २०२६ - ३
नोव्हेंबर २०२६ - ५
डिसेंबर २०२६ - ९
जानेवारी २०२७ - १०
फेब्रुवारी २०२७ - १२
मार्च २०२७ - १०
एकूण - ५२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.