संक्षिप्त

संक्षिप्त
Published on

PNE26W18788
फोटो ओळ : सोलापूर : येथील कै. लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्थाध्यक्ष शंकर चौगुले व मुख्याध्यापिका अंबूबाई पोतू.

सुकळे प्रशालेत गुणवंतांचा सत्कार
सोलापूर : येथील कै. लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी संस्थाध्यक्ष शंकर चौगुले, मुख्याध्यापिका अंबूबाई पोतू, शिक्षक विवेकानंद अनभुले, दणाणे तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राचप्पा मिराखोर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
..........
PNE26W18854
प्रा. मल्लिकार्जुन पाटील यांना पीएच.डी.
सोलापूर : येथील व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे शारीरिक शिक्षण संचालक व उपप्राचार्य प्रा. मल्लिकार्जुन भालचंद्र पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. ‘महिला महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयक सोयी-सुविधांचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. बार्शी येथील प्रा. डॉ. अनिल कांबळे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. प्रा. पाटील हे गेली २० वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजशेखर शिवदारे, विश्वस्त प्रा. भीमाशंकर शेटे, प्रभारी प्राचार्य डॉ. अनमोल वळसंगे आदींनी अभिनंदन केले.
.............
बास्केटबॉल निवड चाचणीचे आयोजन
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनतर्फे १६ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन सोमवारी (ता. १८) करण्यात आले आहे. ही चाचणी सायंकाळी ५.३० वाजता सेलिब्रेशन बास्केटबॉल क्रीडांगणावर होणार आहे. १ जानेवारी २०१० नंतर जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येईल. इच्छुकांनी दिनेश सारंगी व नवीद मुन्शी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
........................................
सोनी महाविद्यालयाचा बारावीचा शंभर टक्के निकाल
सोलापूर : येथील डी. एच. बी. सोनी महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत वैष्णवी म्हेत्रे (८९.८३ टक्के) हिने प्रथम, मिताली मैत्रे (८८.३३ टक्के) हिने द्वितीय, तर गौरी स्वामी (८७ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला. विज्ञान शाखेत श्रीनिवास लिगाडे (७८.१७ टक्के) प्रथम, प्रणाली कमलापुरे (७५.८३ टक्के) द्वितीय, तर श्रेयस चराटे (७५.६७ टक्के) तृतीय आला. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मधुसूदन करवा व प्राचार्या डॉ. आशा रोकडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-----------------------------------
PNE26W18856
फोटो ओळ : सुजाता घोळवे-घुगे

सुजाता घोळवे-घुगे यांना पीएच.डी.
सोलापूर : दहिटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विज्ञान शिक्षिका सुजाता चंद्रकांत घोळवे-घुगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
इंग्रजी विषयातील ‘फॅन्टसी अँड रिऍलिटी इन द सिलेक्ट नोव्हेल्स ऑफ पीटर एस. बीगल : अ क्रिटिकल स्टडी’ या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. डॉ. मनोहर जोशी यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडीक व विस्तार अधिकारी जमादार यांनी अभिनंदन केले.
..........
राज मेमोरियल स्कूलचे उज्ज्वल यश
सोलापूर : येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. ऋतुजा जमादार हिने ९५.४० टक्के गुणांसह प्रथम, अर्पिता पवार हिने ९४.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर जरीन चौधरी व ओंकार शेट्टी यांनी ९४ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. संस्थाध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे व मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
-----------------------------
प्रिया कुमावत हिचे यश
सोलापूर : येथील बटरफ्लाय इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये प्रिया कुमावत हिने ९४.४० टक्के गुणांसह प्रथम, युसूफ सौदागर याने ९२ टक्के गुणांसह द्वितीय, तर आफताब शेख याने ९१.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष ॲड. एस. आर. पाटील व मुख्याध्यापिका डॉ. रश्मी कुंभार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com