जागेवर ३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश

जागेवर ३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश
Published on

SLC26B30027
सोलापूर : नियुक्ती आदेश देताना अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, सीईओ कुशल जैन आदी.

जागेवर ३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश

जिल्हा परिषद सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या माध्यमातून ३३२ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे जागेवर नियुक्ती आदेश आज देण्यात आले. सोलापूर जिल्हा परिषदेने ‘सेवा संकल्प अभियाना’ची सुरुवात केली. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील पांडुरंग ज्ञानेश्वर शिंदे व आदिती चव्हाण यांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आदी उपस्थित होते.
बीबीदारफळ व मार्डी या ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या सहभागातून दर रविवारी गावात स्वच्छता मोहीम राबवून आदर्श निर्माण केला आहे. नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासोबतच ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. सेवा संकल्प अभियान केवळ एका महिन्यापुरते मर्यादित न ठेवता त्यानंतरही विविध उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी आभार मानले.

दोन ऑक्टोबरला महाश्रमदान
सेवा संकल्प अभियानासोबतच २ ऑक्टोबर रोजी आयोजित स्वच्छता महाश्रमदानात नागरिकांनी सहभागी व्हावे. बीबीदारफळ येथे सलग ४९व्या रविवारी स्वच्छता उपक्रम राबविला जात आहे. मार्डी ग्रामपंचायतीने या उपक्रमाची सुरुवात केली असून, अकोलेकाटी व बीबीदारफळ ग्रामस्थही स्वच्छतेच्या कामात पुढाकार घेत आहेत. प्रत्येकाने किमान एक दिवस स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com