

सलग दुसऱ्या वर्षीही शिक्षक दिनाचा मुहूर्त हुकला
जिल्ह्यातील ४४ शिक्षक आदर्श पुरस्काराच्या प्रतीक्षेत
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ ः सोलापूरच्या विकासासाठी दक्ष असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांची आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासाठी वेळ न मिळाल्याने सलग दुसऱ्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण रखडले आहे. ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त पुरस्काराचे वितरण होणे अपेक्षित असताना शिक्षक दिनाचा मुहूर्त हुकला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पालकमंत्री गोरे यांची वेळ मागितली आहे, वेळ मिळाल्यानंतर पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. याबाबत शिक्षक संघटनांनी किमान पुरस्कार वितरणासाठी पालकमंत्री यांनी वेळ द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
२०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षातील पुरस्काराचे वितरण रखडले आहे. मागील वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यात महापूर आला होता, त्यानंतर निवडणूक आचारसंहितेमुळे पुरस्कार वितरण पुढे ढकलण्यात आले. अखेर ते झालेच नाही. यासाठी जिल्ह्यातून शिक्षकांची निवडही करण्यात आली. यंदा मात्र कोणतीही निवडणूक वा महापूर नसताना पुरस्कार वितरण होऊ शकले नाही. पालकमंत्री गोरे यांची वेळ मिळण्याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला. पण ५ सप्टेंबरचा मुहूर्तावर पुरस्काराचे वितरण होणे अपेक्षित असताना वितरण होऊच शकले नाही.
मागील वर्षीचे २२ व चालू वर्षातील २२ असे एकूण ४४ शिक्षकांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात येते. एका तालुक्यातून दोन शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. यासाठी प्रस्ताव मागवले जातात. यामध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून तीन सदस्यीय पथकाकडून प्रस्तावाची छाननी केली जाते, यातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यातून ३४ तर शिष्यवृत्ती प्रवर्गातून १० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
कोट
- आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पालकमंत्री यांची वेळ मागितली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारास प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यात आली आहे. लवकरच नावे जाहीर करण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून पालकमंत्री यांच्याकडून तारीख मिळताच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
- कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.