यूडीसीपीआर नियमांची कडक अंमलबजावणी

यूडीसीपीआर नियमांची कडक अंमलबजावणी

Published on

ब्ल्यू लाइन-रेड लाइनशिवाय
बांधकामाला नाही परवानगी
यूडीसीपीआर नियमांची कडक अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३ : शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत राहावा आणि नैसर्गिक नदी- नाल्यांच्या प्रवाहावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी सोलापूर महानगरपालिकेने महत्त्वाचा व दूरगामी निर्णय घेतला आहे. यापुढे यूडीसीपीआर नियम ३.१.१ (ii) नुसारच ले-आउट मंजुरी व बांधकाम परवानगी देण्यात येणार असून, ब्ल्यू लाइन, रेड लाइन व आपत्ती व्यवस्थापन आराखडा (डीएमपी) यांचे काटेकोर पालन बंधनकारक करण्यात आले आहे.
शहरातील सर्व नैसर्गिक नदी व नाल्यांचे प्रवाह विद्यमान विकास आराखड्यात (डीपी) समाविष्ट करण्यात आले असून, हा आराखडा शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. तसेच नैसर्गिक प्रवाह दर्शविणारा स्वतंत्र डीएमपी आराखडा यापूर्वीच मंजूर होऊन महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आदिला नदीसाठी जलसंपदा विभागामार्फत रेड लाइन व ब्ल्यू लाइन मार्किंग करण्यात येणार असून, अधिकृत रेखांकन प्राप्त झाल्यानंतर त्यानुसारच बांधकाम परवानगी प्रक्रियेत अभिप्राय देणे संबंधित अभियंत्यांना बंधनकारक राहणार आहे. शहरातील इतर नाल्यांच्या बाबतीत गाव नकाशे, डीपी व डीएमपी यांच्या आधारे नाल्यांच्या बाह्य हद्दी निश्चित करून त्यानुसार मार्किंग केली जाणार आहे. डीएमपीमध्ये दर्शविलेल्या नाल्यांची स्थिती, मोजमाप व डिझाईनमध्ये कोणताही बदल करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
---
महत्त्वाचे मुद्दे...
- २ फेब्रुवारी २०२६ पासून नियमांची अंमलबजावणी
- ब्ल्यू लाइन, रेड लाइन व डीएमपीशिवाय ले-आउट व बांधकाम परवानगी नाही
- नाल्यांच्या डिझाईन, रुंदी व प्रवाहात बदलास सक्त मनाई
- जबाबदारी मिळकतदार व लायसन्सधारक अभियंता / वास्तुविशारदांवर
- कुचराई किंवा हलगर्जीपणास शिस्तभंगाची कारवाई
- नगररचना विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांना काटेकोर आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com