पीएच.डी.च्या ४४८ जागांसाठी होणार ‘पेट’

पीएच.डी.च्या ४४८ जागांसाठी होणार ‘पेट’
Published on: 

विद्यापीठाचा लोगो

‘पीएच.डी.’च्या ४४८ जागांसाठी होणार ‘पेट’
अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ; परीक्षार्थींना घरबसल्या देता येईल परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ‘पेट-१०’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पीएच.डी.च्या ४४८ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी इच्छुकांना उद्यापासून (ता. १४) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
विद्यापीठासह संलग्नित उच्च महाविद्यालयांमधील मार्गदर्शकांच्या (गाईड) उपलब्धतेनुसार यंदा विविध विषयांमध्ये ४४८ उमेदवारांना पीएच.डी.ची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. नोव्हेंबरअखेर ‘पेट’ घेण्याचे नियोजन विद्यापीठाकडून सुरू आहे. उमेदवारांना दोन दिवसांत ‘पेट’संदर्भातील सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. ‘पेट’साठी गतवर्षीप्रमाणे यंदाही प्रॉक्टरिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे. परीक्षार्थी त्यांच्या सोयीनुसार कोठूनही परीक्षा देऊ शकणार आहेत; पण नेटवर्क असलेल्या ठिकाणी त्यांनी बसावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. परीक्षा चालू असताना मधूनच परीक्षार्थी लॉगआउट झाल्यास त्यांना पुन्हा लॉगिन करता येणार नाही. परीक्षा देताना त्यांना मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपचा समोरील बाजूचा कॅमेरा चालू ठेवावा लागणार आहे. परीक्षा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत त्यांची नजर स्क्रीनसमोरच अपेक्षित आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठात अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक तैनात केले जाणार आहे. दरम्यान, कोणत्याही परीक्षार्थ्याने परीक्षा सुरू असताना स्वतःची नजर इकडे-तिकडे फिरवल्यास त्याला परीक्षेतून बाहेर केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चौकट
उमेदवारांनी येथे करावा अर्ज
‘पीएच.डी.’पूर्व परीक्षेसाठी (पेट) उमेदवारांना १४ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या https://www.sus.ac.in या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे. ‘पेट-१०’साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

कोट: PNE26W57979
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ‘पेट-१०’ची तयारी केली आहे. इच्छुक उमेदवारांना बुधवारपासून अर्ज करता येणार आहेत. मागील वर्षीप्रमाणेच ‘पेट’ ऑनलाइन होईल. परीक्षार्थींवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठाची स्वतंत्र टीम तैनात असणार आहे.
- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र-कुलगुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com