पाण्याचे दिवस कमी करण्याचे नियोजन करा : महापौर

पाण्याचे दिवस कमी करण्याचे नियोजन करा : महापौर

Published on

SLC26B28277
सोलापूर ः पाणीपुरवठ्यासंदर्भातील बैठकीला उपस्थित असलेले महापौर विनायक कोंड्याल, आयुक्त ओम्बासे व अन्य.

पाणीपुरवठ्याचे अंतर कमी करण्याचे नियोजन करा : महापौर
पाणी पुरवठ्यासंदर्भातील प्राथमिक बैठकीत कोंड्याल यांनी दिले आदेश

सोलापूर, ता. २४ : उन्हाळा तोंडावर असताना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवत वितरणाचे दिवस कमी करण्याचे नियोजन करा, असे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर पुढील बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.

महापालिकेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आज (मंगळवारी) सकाळी शहर पाणीपुरवठ्यासंदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक झाली. या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, उपअभियंता सतीश एकबोटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कोंड्याल यांनी सांगितले, स्काडा सिस्टीमचा फायदा झाला आहे. मेन लाइनवरील वॉलसाठी याची मोठी मदत झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात स्काडा प्रणाली तसेच इतर संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक अडचणी आणि उपाययोजना सूचविण्यात येतील. या सिस्टीमचेही प्रात्यक्षिक थेट पाहण्यात येणार आहे. त्यानंतर काय करायचे आणि काय नाही यावरही चर्चा होईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

सात वर्षांत ३० हजार नवीन नळ कनेक्शन
शहरात गेल्या सात वर्षांत तीस हजार नवीन नळ कनेक्शन वाढले आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. परिणामी शहरासाठी पाणीपुरवठ्याचे दिवस वाढले. उन्हाळा तोंडावर असल्याने पाण्याचे दिवस कमी करण्यात अडचणी येणार आहेत. पाणीपुरवठा विस्कळित होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एकवट मानधनावर निवृत्त अधिकाऱ्यांना सेवेत घेणार
पाण्याचे दिवस कमी करण्यासाठी पाणीपुरवठा विभागासंदर्भातील निवृत्त अधिकाऱ्यांनाही एकवट मानधनावर सेवेत घेण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. त्या अनुषंगाने काही निवृत्त अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.

सर्वपक्षीय गटनेत्यांना बैठकीला बोलवावे : अमोल शिंदे
पाणीपुरवठ्यासंदर्भात झालेल्या बैठकीला महापौर यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना निमंत्रित केले नाही. अशा बैठकींना सर्वांना निमंत्रित करणे गरजेचे आहे. केवळ भाजप पदाधिकाऱ्यांना घेऊन ही बैठक झाली. पाणीपुरवठा हा महत्त्वाचा विषय आहे. सोलापूरकरांना या नियोजनाची माहिती मिळाली पाहिजे. दुहेरी जलवाहिनीचे काम झाले तरीही शहराचा पाणीपुरवठा सुधारला नाही. अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. महापौरांनी यापुढे सर्वपक्षीय गटनेत्यांना बैठकांना बोलावले नाही तर अखेर आयुक्तांसोबत आम्हालाही स्वतंत्र बैठका घ्याव्या लागतील असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com