सोलापूर जिल्ह्यात ७१ हजार हेक्टरवर लागवड; कंबाईन हार्वेस्टरमुळे कापणीला आला वेग

सोलापूर जिल्ह्यात ७१ हजार हेक्टरवर लागवड; कंबाईन हार्वेस्टरमुळे कापणीला आला वेग
Published on

ROP26B02613
मेंढापूर (ता. पंढरपूर) : येथे कंबाईन हार्वेस्टरच्या साह्याने सुरू असलेली गव्हाची कापणी. (छायाचित्र : मोहन काळे, रोपळे बुद्रूक)
---
अनुकूल हवामानामुळे गहू उत्पादनवाढीची चिन्हे
जिल्ह्यात ७१ हजार हेक्टरवर लागवड; कंबाईन हार्वेस्टरमुळे कापणीला आला वेग
मोहन काळे : सकाळ वृत्तसेवा
रोपळे बुद्रूक, ता. १२ : सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामातील गव्हाच्या कापणीला सध्या वेग आला असून, यंदा अनुकूल हवामानामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पेरणीनंतर कापणीपर्यंत थंडीचा प्रभाव कायम राहिल्यामुळे गव्हाच्या वाढीस पोषक वातावरण मिळाले. त्यासोबतच शेतकऱ्यांनी केलेले संतुलित खत व पाणी व्यवस्थापन यामुळे कणसांची वाढही चांगली झाल्याचे दिसत आहे.
मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात ७१ हजार ५२९ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. बार्शी, पंढरपूर, माढा, मोहोळ, सांगोला व करमाळा या तालुक्यांत गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचे एकरी उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी सुधारित वाणांची लागवड करण्यावर भर दिला. विशेषतः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ‘फुले समाधान’ हे वाण वेळेत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य असल्याने त्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली. या वाणामुळे कणसांची वाढ चांगली होऊन दाण्यांची भर चांगली झाल्याचे शेतकरी सांगतात.
दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी कंबाईन हार्वेस्टरच्या साहाय्याने गव्हाची कापणी व मळणी सुरू आहे. आधुनिक यंत्रसामग्रीमुळे कापणीची कामे जलद गतीने होत असून, मजुरी खर्चातही बचत होत आहे. कापणीनंतर गहू वाळवून सुरक्षित साठवण करण्याचे कामही सुरू आहे. एकूणच अनुकूल हवामान, सुधारित वाणांचा वापर आणि योग्य पीक व्यवस्थापन यामुळे यंदाचा गहू हंगाम समाधानकारक ठरत असल्याचे चित्र आहे.
---
कोट :
ROP26B02615
आमच्या १२ गुंठे क्षेत्रात यंदा ७ क्विंटल गहू झाला आहे. गेल्या वर्षी याच क्षेत्रात ५ क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळाले होते.
- कैलास व्यवहारे, शेतकरी, मेंढापूर, ता. पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com