

पाणी भरणाऱ्या महिलेचा विनयभंग;
सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल
सोलापूर : घराजवळ पाणी भरत असताना एकटक बघणाऱ्या कासीम सय्यद याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने अश्लिल भाषा वापरून अश्लिल हावभाव केले. पीडिता व तिच्या मुलीकडे पाहून त्याने अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी कासीम सय्यद याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
१७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडिता घराजवळ पाणी भरत होती. त्यावेळी कासीम हा पीडितेकडे एकटक नजरेने पाहात होता. पीडितेने त्याच्याकडे विचारणा केली, त्यावेळी ‘बघितले म्हणून काय झाले, तु बघत होती म्हणून मी बघितले’ असे तो म्हणाला. त्यानंतर घाबरून पीडिता घरी गेली. दुपारी दीडच्या सुमारास कासीमने पुन्हा पीडित महिला व तिच्या मुलीकडे पाहून अश्लिल हावभाव, हातवारे केले. त्यानंतर त्याने हाताचा इशारा करून गळा चिरून जिवे मारीन, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यावेळी पीडितेने ‘डायल ११२’वर कॉल केला होता. मात्र, पीडितेने गुरुवारी (ता. २७) सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी कासीम सय्यदविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक अनिल राजगुरू तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.