

ROP26B02921
नागुलगाव (ता. कळंब, जि. धाराशिव) : वाहनातून दुष्काळग्रस्त कुटुंबीयांना दिवाळीसाठी किराणा किटचे वाटप करताना मदत संकलन परिवाराचे कार्यकर्ते.
--
सोलापूरच्या तरुणांचे मराठवाड्यात माणुसकीचे दान!
१,२५० कुटुंबांना किराणा किट; आत्महत्याग्रस्त पाच कुटुंबांना वर्षभराचे धान्य
सकाळ वृत्तसेवा
रोपळे बुद्रूक, ता. ३ : संकट कोणतेही असो, माणुसकीचा हात पुढे करण्यात सोलापूरचे तरुण नेहमीच आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महापुराने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मदत केल्यानंतर यंदा दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ‘मदत संकलन परिवार, महाराष्ट्र’च्या ‘दातृत्वाची दिवाळी २०२६’ अभियानांतर्गत बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील १ हजार २५० कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच आत्महत्याग्रस्त पाच कुटुंबांना वर्षभर पुरेल एवढे धान्य देण्यात आले.
नोकरी व व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक असलेल्या सोलापूरच्या तरुणांनी मित्रमंडळी आणि नागरिकांकडून मदत संकलित करून ती थेट गरजू कुटुंबांपर्यंत पोचवली. बीड जिल्ह्यातील सांगवी, एकुरका, माळेवाडी, साबळा, धर्माला, धोतरा, येवता, जीवाचीवाडी, बोपला तसेच धाराशिव जिल्ह्यातील निपाणी, बांगरवाडी, नागुलगाव आदी गावांत हे वाटप करण्यात आले.
यावेळी विक्रम मगर यांनी शेतकरी कुटुंबांशी संवाद साधला. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय नसून जीवन अनमोल आहे. संकटांशी खंबीरपणे लढा आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमात संदीप पाटील, प्रशांत मोरे, सुनील कौलगे, सूरज काळे, अनूप शेठ, अभिजित मोरे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.
---
कोट
ROP26B02922
महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळ असला तरी मराठवाड्याला त्याची झळ अधिक बसली आहे. त्यामुळे बीड व धाराशिव जिल्ह्यांतील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन संकटात सापडलेल्या कुटुंबांना धीर दिला आणि त्यांच्यासाठी किराणा किटची व्यवस्था केली.
- विक्रम मगर, संचालक, मदत संकलन परिवार, महाराष्ट्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.