
पुणे : येथील सदाशिव पेठेत भावे हायस्कूल समोर शनिवारी रात्री भरधाव मद्यपी चारचाकी चालकाने १२ जणांना उडवले. या अपघातात बाराही जण जखमी झाले असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रशांत बंडगर या तरुणाचा समावेश आहे. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.