Pune Solid Waste : पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन होणार हायटेक

बाणेर, बालेवाडी भागात स्वच्छता कर्मचाऱ्यांवर जीपीएसद्वारे नियंत्रण ठेवून, त्यांची कार्यक्षमता राबविण्याचा प्रयत्न महापालिकेने केला होता.
pune solid waste
pune solid wastesakal

पुणे - बाणेर, बालेवाडी भागात स्वच्छता कर्मचाऱ्यांवर जीपीएसद्वारे नियंत्रण ठेवून, त्यांची कार्यक्षमता राबविण्याचा प्रयत्न महापालिकेने केला होता. त्यामध्ये बऱ्यापैकी यश आल्याने आता पुढच्या महिन्यापासून संपूर्ण शहरात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मनगटावर जीपीएस बँड बांधून त्याद्वारे ट्रॅकिंग करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

शहरात रोज २२०० टन कचरा निर्मिती होते. या प्रक्रियेमध्ये सुमारे १५ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या या कर्मचाऱ्यांवर क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुकादमाकडून नियंत्रण ठेवले जाते. पण यामध्ये कामचुकारपणा आणि इतर प्रशासकीय अडचणींमुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून घेण्यासाठी महापालिकेने ‘इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ ही प्रणाली स्वीकारून त्या माध्यमातून काम सुरू केले आहे.

औंध-बाणेर-बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर सुरू केला. यामध्ये सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांच्या मनगटावर जीपीएस बँड बांधून त्याद्वारे त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. गेल्या सात महिन्यात क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थितीचे प्रमाण चांगले वाढले. तसेच कचऱ्याचे संकलन सुमारे १२५ टनाने वाढले आहे.

या प्रणालीद्वारे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील स्वच्छता, कचरा संकलन, वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात आले. कर्मचारी कोणत्या भागात गेले, कोणत्या भागात स्वच्छता झालेली नाही याची लगेच माहिती मिळत असल्याने त्यांच्याकडून काम करून घेणे सोपे झाले. तसेच सर्व भागातून कचरा संकलन करून त्याची व्यवस्थित वाहतूक सरू आहे की नाही याचीही माहिती मिळाली. त्यामुळे या भागातील स्वच्छतेत भर पडली आहे.

मे महिन्यात या प्रणालीसंदर्भात आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांच्याकडे सादरीकरण झाले. त्यामध्ये औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत हा प्रयोग यशस्वी झाल्याने शहरातील उर्वरित १४ क्षेत्रीय कार्यालयात याची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

ही प्रणाली अमलात आणल्यानंतर त्यामध्ये १४ हजार कर्मचारी, ६७३ कचरा वाहतुकीची वाहने व चालक, प्रकल्पांवरील कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. यासाठी महापालिकेला १६ कोटी रुपये खर्च येणार आहे.

अशी आहे कार्यप्रणाली

- कचरा वाहतूक वाहनांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग्ज व जीपीएस यंत्रणा बसविण्यात येईल.

- कोणत्या ट्रकमधून किती कचरा प्रक्रिया केंद्रावर आला व किती कचऱ्यावर प्रक्रिया झाली याची माहिती मिळणार

- कर्मचाऱ्यांच्या मनगटावर जीपीएस प्रणालीचा पट्टा बांधला जाईल.

- त्यांच्या कामाची वेळ, किती अंतर झाडले याची नोंद होणार

- त्यावर नियंत्रण कक्षातून लक्षही ठेवले जाईल.

‘औध बाणेर बालेवाडी भागात ‘इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’चा वापर योग्य पद्धतीने झाला आहे. या पद्धतीने संपूर्ण शहरात काम करण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही यंत्रणा सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयात कार्यान्वित केली जाईल. त्यामुळे ऑनलाइन हजेरी घेता येईल व कचरा व्यवस्थापनाच्या कामात सुधारणा होतील.

- विक्रमकुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com