

सूचना - माझी भूमिका सदर मेन करावे. गोष्ट सोलो ट्रॅव्हलिंगची आणि एकुलती एक ही सदरे उजवीकडच्या दोन कॉलमांत लावावीत. जागा असल्यास कोणतेही आवाहन लावले तरी चालेल.
------------------
मैत्रीण, ता. २५ जूनच्या अंकासाठी
------------
ब्युटी विथ एलिगन्स फोटो नंबर
जान्हवी गोखले PNE26W28250
मयूरी पवार PNE26W28260
प्रियंका पाटील PNE26W28284
ज्ञानेश्वरी पाटील PNE26W28373
रूपाली वराडे PNE26W28380
प्रा. माधवी अष्टपुत्रे PNE26W28382
सुवर्णा बागूल-बोरसे PNE26W28384
अक्षता गायगवारे PNE26W28409
--------------
घरातील हिरवाई PNE26W29077, PNE26W29079, PNE26W29123, PNE26W29126, PNE26W29131
गोष्ट सोलो प्रवासाची PNE26W29133, PNE26W29136, PNE26W29140
फ्युजन रेसिपी PNE26W29141
एकुलती एक PNE26W29149
-----------
मी एकुलती एक... लोगो
स्मिता रोंघे
जबाबदारी पेलण्याची शक्ती
मी घरात एकुलती एक मुलगी. घरात मी माझे वडील आणि वडिलांची आई म्हणजे माझी आजी असे आम्ही तिघेच राहत होतो. पुण्यात शनिवार पेठेत नातूवाड्यात आमचे घर होते. शाळेत तेव्हाची अकरावी पास झाले; पण आजीचे वय पासष्टच्या पुढे असल्यामुळे तिला मदत करणे भाग होते, त्यामुळे पुढे कॉलेजला जाण्याचा प्रश्नच नव्हता. आजीच्या आग्रहास्तव लग्नाची बोलणी सुरू झाली आणि लवकरच तत्कालीन औरंगाबाद येथील स्थळ नक्की होऊन मी तिकडे गेले. माहेरी एकुलती एक असल्यामुळे निदान सासरीतरी भरलेले घर मिळावे ही अपेक्षा होती.
मात्र, सगळ्यांना शंका होती, की लग्नानंतर माहेरी एकुलती एक असलेली सासरी भरलेल्या घरात कशी काय सामावून घेतली जाईल; पण सासरी सासू-सासरे, दीर, जावा, त्यांची मुले आणि एक नणंद या सगळ्याबरोबर खरा संसाराचा प्रवास सुरू झाला. सर्व सण/ समारंभ आनंदात आणि उत्साहात खेळीमेळीत एकजुटीने साजरे होऊ लागले.
अर्थात आयुष्यात आनंदाबरोबर तणावाचे आणि परीक्षेचे दिवस येतच असतात, त्याप्रमाणे पुढे सासूबाईचे आणि वडिलांचे आजारपण जवळपास एकाच वेळी आले. पुण्याला वडील एकटे असल्यामुळे त्यांनाही सासरी घेऊन यावे लागले. या दोघांची आजारपणे आणि दोन लहान मुलांचे संगोपन हे सर्व मिस्टर आणि सासरे यांच्या मदतीमुळे करता आले. त्यानंतर नणंदेचेही कॅन्सरचे दुखणे आले. या सर्वांना सामोरे जाताना दमण्याची शंका यायलासुद्धा वेळ नव्हता.
या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्यामुळे ‘माहेरची एकुलती एक मुलगी पुढे सासरी मोठ्या घरात सामावली जाईल का?’ अशी शंका घेणाऱ्यांना समर्पक उत्तर दिले गेले. त्यामुळे एक गोष्ट नक्की, की जबाबदारी अंगावर पडली, की कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदारीच्या जाणिवेतून त्या पेलण्याची शक्ती नक्कीच येते.
एकुलती एक ही फक्त लाडाची नाही, तर माहेर आणि सासर या दोन्ही घरांच्या जबाबदाऱ्या पेलताना स्वतःला सिद्ध करून खरोखरच दोन्ही घरची लाडाची लेक होऊ शकते.
-------------
गोष्ट सोलो ट्रॅव्हलिंगची... लोगो
श्रेया भंडारे
चांगुलपणाचीही ‘भेट’
पूर्वी मला वाटायचं, की ग्रुपमधूनच फिरायला जाण्यातच मजा असते; पण एका वर्षी मला सोलो ट्रॅव्हलची अतोनात इच्छा होऊ लागली. तेव्हा फॅसिनेट करणारं एकच ठिकाण डोळ्यासमोर होतं आणि ते म्हणजे हंपी-बदामी. मी लगेचच हंपीसाठी बस-ट्रेन बघायला सुरुवात केली; पण सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होता मुक्कामाचा. कारण एखादी मुलगी भारतात कुठंही एकटी फिरायला जाते तेव्हा निम्म्या वेळी तिची सुरक्षितता तिच्या मुक्कामाच्या ठिकाणावरून ठरते. मी खूप शोधाशोध केली आणि पूर्वी हंपीला जाऊन आलेल्या लोकांकडून हॉटेल आणि होमस्टे यांच्याबाबतची माहितीही गोळा केली. शेवटी एक छान होमस्टे सापडला; पण त्यांच्या मूळ होमस्टेवर रूम्स उपलब्ध नव्हत्या. मी त्यांना विश्वासात घेऊन माझ्या सोलो ट्रॅव्हलबद्दल सांगितलं आणि त्यांनी खूप कमी कालावधीत मला त्यांच्या घराला अगदी लागून असलेल्या होमस्टेमध्ये माझी सोय करून दिली. पुढे ‘जे होईल ते होईल, पाहून घेऊ’ असं धोरण धरलं आणि हंपीची वाट धरली.
होसपेटपर्यंत बसनं प्रवास करून गेले. आमच्या होमस्टेचालकांनी त्यांच्या ओळखीच्या रिक्षावाल्यांना मला न्यायला आणण्यासाठी पाठवलं होतं. ते गप्पीष्ट होते आणि रिक्षाचालक म्हणून नवीन होते. त्यांना मोडकं-तोडकं हिंदी येत होतं आणि इंग्लिश तर नाहीच. सुरुवातीला माझा विचार बाइक भाड्यानं घेऊन हंपी फिरण्याचा होता; पण रिक्षाचालक अण्णांमुळे मी तो बदलला. एका स्थानिक माणसासोबत ती जागा एक्स्प्लोअर करण्याचा अनुभव वेगळाच असतो ना. पहिला दिवस मी मूळ हंपी गावात पायी फिरले. विरुपाक्ष मंदिर, हंपी बाजार, तुंगभद्रा नदीचा घाट, मातंगा टेकडी ही ठिकाणं निवांत एक्स्प्लोअर केली. हेमकुता टेकडीवरून सुंदर सूर्यास्त पाहिला. एक-दोन लोकांनी एकटीनं फिरण्याबद्दल माझ्याकडे चौकशी करायचा प्रयत्नही केला; पण मी त्यांच्या चौकशीला दाद दिली नाही.
सूर्यास्त बघून मला बाहेर पडायला उशीर झाला, तेव्हा होम स्टेचालक मला स्वतः त्यांच्या गाडीवरून घ्यायला आले. मी त्यांच्याच घरी रात्रीचं जेवण केलं. त्यांचा बायकोनं अगदी घरगुती स्वयंपाक केला होता, मला त्यामुळे घरात राहिल्यासारखंच वाटत होतं. दुसरा दिवस हा रामायणावर आधारित ठिकाणांना भेटी द्यायचा होता. त्यातील काही महत्त्वाची ठिकाणं म्हणजे अंजनाद्री बेट्टा, शबरीची गुहा आणि पंपा सरोवर, वाली गुहा, चिंतामणी मंदिर आणि घाट. आज मात्र मला माझ्यासारखे सोलो ट्रॅव्हल करणारे सोबती भेटले. मैत्रिणींचा एक ग्रुप आला होता फिरायला. त्यातल्या मुलींना माझ्या सोलो ट्रॅव्हलिंगचं अप्रूप वाटलं. सर्वांत हटके असं ठिकाण म्हणजे ओनके किंडी (पुराणकालीन चित्रं). या ठिकाणी जाण्याचं माझं नियोजन नव्हतं. फक्त रिक्षाचालक अण्णांमुळे मी तिथे जाऊ शकले. त्यांनीच मला तिथं एका गाइड काकांशी ओळख करून दिली. या ठिकाणी जायचा रस्ता एका भाताच्या शेतातून जात होता आणि तिथं जायचा रस्ता फक्त गाइड काकांना माहीत होता. आदिमानव काळात राहणाऱ्या माणसांनी boulders वरती चित्रं रंगवली होती. आजूबाजूला फक्त मोठे दगड, सुपारीची झाडे आणि कमालीची शांतता.
वाटेत रिक्षाचालक मला त्या परिसरातलं पर्यटन आणि इथल्या लोकांवर त्याच्या होणाऱ्या परिणामविषयी गप्पा मारत होते. जेवण, चहाबरोबर चांगल्या आणि सुरक्षित ठिकाणी न्यायची जबाबदारी त्यांनीच घेतली होती. त्यामुळे मला त्याबाबत चिंता करावी लागली नाही. नाष्टा आणि रात्रीचं जेवण होमस्टे चालकांच्या घरी असल्यानं कुठं जायची गरजच पडली नाही. शेवटचा दिवस हंपीजवळची उरलेली काही ठिकाणं बघण्यात गेला. लक्ष्मी नरसिंह मंदिर, बडावलींगा, भूमिगत शिव मंदिर, जल महाल, विजय विठ्ठल मंदिर ही सर्व ठिकाणं पाहून झाली. विजय विठ्ठल मंदिराचा पंढरपूरशी असलेला संबंध आणि तिथली शिल्पकला अचंबित करणारी होती. हंपीतला शेवटचा सर्वांत सुंदर सूर्यास्त मी मान्यवंत सगुनाथ मंदिरातून पाहिला.
शेवटचा चहा पिऊन मी आता हंपीचा निरोप घेऊन बस पकडायला निघाले. वाटेत रिक्षाचालक अण्णांनी त्यांचा परिवार आणि त्यांच्या जुन्या नोकरीबद्दलचे किस्से सांगितले. शेवटी बसमध्ये बसण्याआधी मी होमस्टे चालकांशी बोलले आणि परत हंपीला आले, की तुमच्याकडेच राहीन असं वचनही दिलं. परतीच्या प्रवासात मला विचार आला, की या दोन व्यक्ती मला भेटल्या नसत्या तर माझा प्रवास खरच एवढा सुखकर आणि अविस्मरणीय झाला असता का? आजकाल सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या प्रत्येक मुलीच्या घरचे तिला काळजीने सांगतात की असं एकटं फिरणं सुरक्षित नाहीये; पण या प्रवासातून मला एवढं कळलं, की आपण समजतो तेवढी वाईट माणसं या जगात नाही आहेत. आपण सतर्क राहायला हवं आणि पटकन कोणावरही विश्वास ठेवू नये, हे मान्य आहे; पण तुम्ही तुमच्या gut feeling वर विश्वास ठेवायला हवा - कारण माणसं कशी आहेत हे ओळखणारा instinct आपल्या सर्वांकडे आहे.
------------
फ्युजन रेसिपी... लोगो
गौरी देव-कुलकर्णी
लसणाच्या पातीचा ठेचा
साहित्य : कोवळी लसणाची चिरलेली पात दोन वाट्या, भाजलेले शेंगदाणे पाव वाटी, हिरव्या मिरच्या दोन, कोथिंबीर थोडी, साखर, मीठ चवीनुसार, तेल, शेंगदाण्याचे जाडसर कूट दोन चमचे, जिरे अर्धा चमचा, तीळ दोन चमचे, हिंग, लिंबू.
कृती : लसणाची पात, भाजलेले शेंगदाणे, जिरे, मिरच्या कोथिंबीर, एक चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यावे. एका कढईत दोन चमचे तेल घालून हिंगाची फोडणी द्यावी. त्यात कुटून घेतलेले मिश्रण घालावे. थोडे परतल्यानंतर साखर, शेंगदाण्याचे कूट, राहिलेले तीळ घालून दोन ते तीन मिनिट परतावे. एक वाफ आणावी. शेवटी थोडे लिंबू पिळावे, ठेचा तयार.
---------
माझी भूमिका... लोगो
नेहा नाईक, अभिनेत्री
‘नशीबवान’ने मला घडवलं
‘नशीबवान’ या मालिकेत मी गिरीजा ही व्यक्तिरेखा साकारली. नुकत्याच संपलेल्या या मालिकेचा प्रवास माझ्यासाठी अनेक अर्थांनी खास आणि संस्मरणीय ठरला. एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून आणि एक स्वतंत्र स्त्री म्हणूनही या काळात मी खूप काही शिकले.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट करत असताना माझी आणि आदिनाथ कोठारे यांची ओळख झाली होती. पुढे ‘नशीबवान’ ही त्यांच्याच निर्मिती संस्थेची मालिका सुरू होत असताना त्यांनी स्वतःहून मला या भूमिकेसाठी विचारणा केली. मी यापूर्वी कधीच मालिका केली नव्हती. त्यामुळे मनात थोडी धाकधूक होती. नाटक आणि चित्रपटाचा अनुभव होता; पण मालिकेच्या कामाची पद्धत पूर्णपणे वेगळी असते, याची जाणीव होती. तरीही मी होकार दिला आणि पुढे सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने जुळून आल्या.
शूटिंग सुरू झाल्यानंतर मला कळलं, की दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी माझं नाव आदिनाथला सुचवलं होतं. काही भूमिका जणू आपल्यासाठीच लिहिलेल्या असतात आणि आपल्यापर्यंत आपोआप येतात. गिरिजाची भूमिका माझ्यासाठी तशीच होती. त्यामुळे या संपूर्ण प्रवासाकडे पाहताना मला नेहमी असं वाटतं, की ही भूमिका माझ्या वाट्याला यायचीच होती.
माझं आजवरचं काम मुख्यतः चित्रपट आणि नाटकांमध्ये होतं. त्यामुळे मालिकांबद्दल काहीसा अंदाज होता, पण प्रत्यक्ष अनुभव नव्हता. सुरुवातीला त्या अज्ञात गोष्टीची भीती वाटत होती; पण म्हणतात ना, पाण्यात पडल्यावर पोहता येतं; अगदी तसंच माझ्या बाबतीत झालं. जसजसं काम करत गेले तसतसा मला मालिकेचा फॉर्म समजत गेला आणि हळूहळू ते कोडं उलगडत गेलं.
नाटक, चित्रपट आणि मालिका ही तिन्ही माध्यमं अभिनयाची असली, तरी त्यांची कार्यपद्धती खूप वेगळी आहे. नाटकाच्या तालमी दिवसेंदिवस चालतात. चित्रपटात किंवा नाटकात तुम्हाला कथेची सुरुवात, मध्य आणि शेवट माहीत असतो; पण मालिकेत सुरुवात माहीत असते, कदाचित मध्यही माहीत असतो, मात्र शेवट कधीच माहित नसतो. त्यामुळे कलाकार म्हणून आपल्याला पात्राबरोबर प्रवास करावा लागतो. पात्र विकसित होत जातं आणि आपणही त्याच्यासोबत विकसित होत जातो. इतर पात्रांच्या प्रतिक्रिया, कथानकातील बदल आणि लेखक-दिग्दर्शकांची दृष्टी यांचा विचार करून स्वतःची भूमिका साकारावी लागते. हे खूप आव्हानात्मक असलं, तरी त्यातच एक वेगळी गंमत आहे. काम करताना कदाचित त्या आव्हानाची पूर्ण जाणीव होत नाही, पण नंतर स्वतःचं काम पाहताना आपण किती शिकलो आहोत हे लक्षात येतं.
या मालिकेमुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यातही खूप मोठे बदल घडले. मी माझं मूळ शहर सोडून नवीन शहरात आले होते. आपली माणसं, आपलं घर, आपला परिसर मागे सोडून एका नवीन ठिकाणी स्वतःचं आयुष्य उभं करणं ही मोठी गोष्ट असते. पहिल्यांदाच मी माझ्या कुटुंबापासून दूर एकटी राहत होते. सुरुवातीला सगळं नवीन होतं; पण हळूहळू मी प्रत्येक गोष्ट स्वतः सांभाळायला शिकले.
स्वयंपाक करण्यापासून ते घरातील कामं करण्यापर्यंत, घर आवरण्यापासून भांडी घासण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मी स्वतः करू लागले. या सगळ्या गोष्टी साध्या वाटल्या, तरी त्या माणूस म्हणून खूप काही शिकवून जातात. एकटं राहिल्यावर आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागतो. आपल्याला काय जमतं, आपण किती सक्षम आहोत याची जाणीव होते. या अनुभवातून मला एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला. मला वाटतं, या काळात मी केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणूनही खूप घडले. याचा माझ्या करिअरलाही नक्कीच फायदा होणार आहे.
मालिका नुकतीच सुरू झाली होती आणि त्याच काळात स्टार प्रवाहचा ‘ढिंगच्याक दिवाळी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी सुरुवातीला मला सूत्रसंचालनासाठी विचारणा करण्यात आली. मी आयुष्यात कधीच अँकरिंग केलं नव्हतं. त्यामुळे साहजिकच थोडं दडपण आलं; पण मी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली. त्यानंतर अमित भानुशाली आणि मी मिळून संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.
हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण मी यापूर्वी कधीही न केलेली गोष्ट अवघ्या दोन दिवसांच्या तयारीत करून दाखवली होती. कलाकार म्हणून नवीन गोष्टी स्वीकारण्याची आणि स्वतःला सतत आव्हान देण्याची ही संधी होती. त्यामुळे हा माझ्या कारकिर्दीतील एक विशेष आणि कायम लक्षात राहणारा किस्सा आहे.
माझ्या मते, कोणत्याही कामात चांगले सहकलाकार मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजते. कारण आजवरच्या प्रत्येक कामात मला उत्तम सहकलाकार लाभले आहेत. ‘नशीबवान’मध्ये अजय आणि आदिनाथ यांच्याशी माझी आधीपासून ओळख होती. त्यामुळे त्यांचं असणं मला खूप आधार देणारं होतं. काम करताना एक कम्फर्ट झोन मिळायचा.
सोनाली आणि प्राजक्ता यांना मी लहानपणापासून दूरदर्शनवर पाहत आले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल कायम एक आकर्षण आणि आपुलकी वाटायची. प्रत्यक्ष काम करताना त्यांच्याशी नातं खुलत गेलं आणि कामाची मजाही वाढत गेली. एवढ्या अनुभवी आणि मोठ्या कलाकारांसोबत काम करताना आपण नकळत घडत जातो. मला एक गोष्ट नेहमी महत्त्वाची वाटते, की जेव्हा एखादा कलाकार नवीन असतो, तेव्हा त्याला त्याच्या नवखेपणाची जाणीव करून देण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन देणं, नवीन गोष्टी करून पाहायला सांगणं आणि अभ्यास करण्यासाठी प्रेरित करणं अधिक महत्त्वाचं असतं. मला माझ्या सहकलाकारांकडून हे खूप मिळालं.
कलाकार म्हणून सर्वांत आनंदाचा क्षण कोणता असेल, तर तो म्हणजे प्रेक्षक तुमच्या कामाशी जोडले जातात तो क्षण. जेव्हा लोक तुम्हाला भेटायला येतात, तुमच्यासोबत फोटो काढतात किंवा तुम्हाला ओळखतात, तेव्हा वाटतं, की आपलं काम लोकांपर्यंत पोहोचत आहे. एकदा मी रेल्वेने प्रवास करत असताना एक मावशी मला भेटल्या. त्यांनी मला नावासह ओळखलं आणि म्हणाल्या, ‘‘तुम्ही नेहा नाईक आहात ना? तुम्ही खूप सुंदर काम केलंय.’’
ती एक साधीशी दाद होती; पण माझ्यासाठी खूप मौल्यवान होती. कारण त्यांनी मला केवळ माझ्या पात्रामुळे नाही, तर माझ्या नावासह ओळखलं होतं. त्यावेळी मला दिग्पालदादांनी सांगितलेलं एक वाक्य आठवलं. मी ‘मुक्ताई’ करत असताना ते म्हणाले होते, ‘‘मुक्ताईपासून नेहा नाईकपर्यंतचा प्रवास खूप मोठा असेल आणि त्या मोठ्या प्रवासाची सुरुवात आत्तापासून होते आहे. खूप मेहनत कर.’’ आज जेव्हा एखादी व्यक्ती मला माझ्या नावाने ओळखते, तेव्हा मला वाटतं की त्या मोठ्या प्रवासाची सुरुवात खरंच झाली आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि खूप मेहनत करायची आहे.
गिरीजा हे पात्र माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे. एकतर संपूर्ण कथानक तिच्याभोवती फिरत होतं. ती अत्यंत मजबूत, स्वतंत्र आणि प्रत्येक घरात आवडावी अशी मुलगी होती. मी ती भूमिका साकारत असल्यामुळे साहजिकच माझं तिच्यावर विशेष प्रेम होतं. मात्र, मला मालिकेतील दुसरं एखादं पात्र साकारण्याची संधी मिळाली असती, तर मला नागेश्वरची भूमिका करायला आवडली असती. कारण त्यात ग्रे शेड्स होत्या. पूर्णपणे चांगलं किंवा पूर्णपणे वाईट नसलेलं, अनपेक्षित वळणं घेणारं पात्र साकारण्याची माझी इच्छा आहे. त्याचबरोबर मला रुद्रचं पात्रही आवडलं असतं. रुद्र हा साधा, सरळ, मनमिळाऊ आणि प्रत्येक घरात हवासा वाटणारा मुलगा होता.
(शब्दांकन : आरसिन तांबोळी)
------------
घरातील हिरवाई... लोगो
सुलभा गायकवाड
छोटी बाग, मोठा आनंद
आपल्या हातांनी, आपल्या मनाप्रमाणे अतिशय जाणीवपूर्वक आणि शास्त्रशुद्ध केलेली सुंदर बाग मन प्रसन्न करतेच त्याबरोबर इतरांनाही आनंद देते. आमचे स्वतंत्र घर आहे. आमच्या सूनबाई सुरेखा यांना बागेची जबरदस्त आवड! त्यांनी स्वतःच्या कल्पनेप्रमाणे, मनाप्रमाणे बाग तयार केली आहे. तुम्ही आमच्या घराचे गेट उघडून आत आलात, की केसरी दांड्याच्या आणि पांढऱ्याशुभ्र नाजूक प्राजक्त फुलांच्या पायघड्या तुमचे स्वागत करतील. समोर असलेल्या खांबावर एकीकडे मोगरा आणि दुसरीकडे मधुमालती यांच्या फुलांनी लगडलेल्या कमाने प्रसन्न करतील. उजव्या बाजूला हिरवीगार तुळस मंजुळांनी भरलेली दिसेल. त्याचबरोबर तगर, सोनचाफा, जास्वंद, गुलाब, लिली आणि कंपाउंडचे बागेचे संरक्षण करणारे पाम ट्री दिसतील. कंपाउंडच्या जाळीवर मनी प्लांट आणि दोन्ही बाजूला शोभेचे वेल दिसतील. त्याच्या पानांचा रंग, आकार आकर्षित करतो. तिथेच भिंतीवर ‘गार्डन रुल्स’ नावाचे एक ‘वॉल हँगिंग’ दिसेल. ‘बागेवर प्रेम करा’, ‘मातीत हात घाला’ अशा सूचना वाचायला मिळतील. थोड्याशा विश्रांतीसाठी तिथे एक सोफा ठेवलेला आहे. खाली फरशी असल्यामुळे तिथे आमच्या नाती बैठे खेळ मैत्रिणीसमवेत खेळतात.
डाव्या बाजूच्या मोठ्या भागात तुम्हाला वेगळेच दृश्य पाहायला मिळेल. इथे कंपाउंडच्या अलीकडे दोन फुटांवर दीड फूट उंचीची भिंत असून त्यावर ग्रॅनाईट बसवलेले आहे. त्यावरही कुंड्या आहेत. भिंत आणि कंपाऊंडच्या मध्ये लिंबू, पेरू, कढीपत्ता अशी सदाहरित झाडे आहेत. मधूनमधून वेगवेगळी फुलझाडे आणि त्यावर ठेवलेल्या कुंड्या ससा, हरीण अशा आकाराच्या असून, त्यामध्ये शोभेची छोटी छोटी रोपे आहेत. थोड्या थोड्या अंतरावर एकझोरा, रेन लिली, पांढरी अपराजिता, गुलबक्षी, स्टार मोगरा, हजारी मोगरा, डबल मोगरा, अबोली आणि शेवंती अशी फुलांनी बहरलेली झाडे मन प्रसन्न करतील.
कोपऱ्यामध्ये केळी, पपई, कढीपत्ता आणि आम्रवृक्ष अशी झाडे असून, ज्याला सुंदर असा ग्रॅनाईटचा पार बांधलेला आहे. शिवाय पालक, कोथिंबीर, पुदिना, अळू, बटाटा, मिरची, गवती चहा अशा भाज्या आपल्या स्वयंपाकाची लज्जत वाढवतात. ब्रह्मकमळ, जाईजुईचे वेल, लाल पांढरी जास्वंदी, एकदम चार फुले फुलणारी लिली बागेची शोभा वाढवतात. अशी तिन्ही बाजूनी हिरवाई आणि विविध रंगांची उधळण लक्ष वेधून घेते. सीझनप्रमाणे येणारी फळे मैत्रिणींना वाटली जातात. बागेत बसून मैत्रिणींच्या बरोबर मारलेल्या गप्पात वेळ कसा जातो हे कळतच नाही. अर्थात हे फक्त शनिवार रविवारीच शक्य होते. कट्ट्यावर मध्ये मध्ये लावलेले दिवे शोभा वाढवतात. पाहुणेही बागेतच बसणे पसंत करतात.
काही झाडांवर पक्ष्यांच्या आकाराच्या कुंड्या, छोट्या छोट्या वेली अंगावर घेऊन विराजमान झालेल्या दिसतात. क्वचित आपणही फसतो. मध्येच वाऱ्याच्या झुळकीबरोबर मंद आवाज करणारे ‘साउंड ऑफ म्युझिक’ करमणूक करते. जागेचा पुरेपूर उपयोग केला असल्यामुळे हिरवा, लाल, पांढरा, गुलाबी, केशरी, जांभळा हे रंग दृष्टीसुख देतात, तर फुलांनी मन मोहून जाते.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.