पुणे -  काही भागातील पाणीपुरवठा ठरावीक दिवशी आजपासून बंद

पुणे -  काही भागातील पाणीपुरवठा ठरावीक दिवशी आजपासून बंद
Updated on

पुणे - वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या भागांपैकी काही भागात पाण्याच्या वितरणाचे फेरनियोजन करण्यासाठी काही भागातील पुरवठा ठरावीक दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारपासून (ता.२९) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. कात्रज, कोंढवा बुद्रुक येथील पाण्याची टाकी, जलवाहिन्या, पंप हाऊस आदी ठिकाणची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे पालिकेने कळविले आहे.  वारानुसार पाणी बंद राहणारा भाग 

सोमवार : भारती विद्यापीठ परिसर, चंद्रभागानगर, फालेनगर, अक्षयनगर परिसर, आंबेगाव पठार परिसर सर्व्हे नं १५ ते ४१ आदी.

मंगळवार :  सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयलगंगा, आनंद विहार, हिंगणे परिसर, आनंदनगर परिसर, रामनगर, संपूर्ण वडगाव परिसर आदी. 

बुधवार : सहकारनगर, धनकवडी गाव परिसर, तळजाई ग्रीन परिसर, बालाजीनगर आदी. 

गुरुवार : बाबूराव सणस विद्यालय परिसर, उत्कर्ष सोसायटी परिसर, लेन नं १ ते १४ परिसर, चव्हाणबाग, डीएसके रस्ता, वेंकटेश सेरेनिटी परिसर, हायब्लीस सोसायटी परिसर, नांदेड फाटापर्यंत, आनंद मंगल कार्यालय परिसर, अभिरूची परिसर, समर्थनगर, दांगटनगर, वडगाव बुद्रुक, धायरी परिसर, माणिकबाग परिसर आदी. 

शुक्रवार : संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, अंजलीनगर, जांभुळवाडी रस्ता, टेल्को कॉलनी, लेक विस्टा सोसायटी परिसर आदी. 

शनिवार : राजीव गांधीनगर, चैत्रबन वसाहत, पद्मावतीनगर, अंबिकानगर, पवन नगर, श्रेयस नगर, काकडे वस्ती, अशरफ नगर, ग्रीनपार्क, हगवणे वस्ती, कोंढवा बुद्रुक गाव, पुण्यधाम आश्रम रस्ता, कामठेनगर, बधे वस्ती, टिळेकरनगर भाग, साईनगर, गजानन नगर, पारगेनगर, येवलेवाडी, सरगम चाळ, रॉयल पार्क परिसर, आंबेडकरनगर परिसर, खडकेवस्ती आदी.

रविवार :  कात्रजगाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, गोकुळनगर, शिवशंभोनगर, भारतनगर, राजस सोसायटी, भूषण आणि इंद्रप्रस्थ सोसायटी, सुखसागर भाग एक आणि दोन, बनकर शाळा परिसर, महादेवनगर, उत्कर्ष सोसायटी परिसर, शेलारमळा, वरखडेनगर, जाधवनगर, विद्यानगर परिसर, आनंदनगर परिसर, माऊलीनगर, विघ्नहर्तानगर, सुंदरबन परिसर, शिक्षक सोसायटी, टिळेकरनगर भाग दोन, स्वामी समर्थनगर आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com