esakal | पुण्यात लसीच्या पुरवठ्याअभावी आज काही केंद्रे बंद राहणार

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
पुण्यात लसीच्या पुरवठ्याअभावी आज काही केंद्रे बंद राहणार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात गुरुवारी दिवसभरात १४ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे महापालिकेकडे ११ हजार डोस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान आज दिवसभरात राज्य सरकारकडून महापालिकेला नव्याने लसीचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) काही केंद्रांवर लसीकरण होईल तर काही केंद्र बंद राहण्याची शक्यता महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

राज्य सरकारकडून मंगळवारी लसीचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे बुधवारी महापालिकेला लसीकरण बंद ठेवावे लागले होते. दरम्यान, काल रात्री २५ हजार डोस महापालिकेला प्राप्त झाले. त्यामुळे आज लसीकरण सुरळीत झाले. एक दिवस लसीकरण बंद राहिल्याने आज पहाटे पाचपासून नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. बुधवारी रात्री उशिरा लस उपलब्ध झाल्याने आज सकाळी काही केंद्रांवर ती पोचण्यास उशीर झाला. त्यामुळे त्या केंद्रांवर उशिरा लसीकरण सुरू झाले. केंद्रांवर प्रचंड गर्दी झाल्याने काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करून गर्दीवर नियंत्रण करण्यात आले.

उपलब्ध झालेल्या डोसमधून दुसऱ्या डोस असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यामुळे तास न् ‌तास उभे राहिल्यानंतरही काही नागरिकांना परत जावे लागले. त्यातच एक मे पासून लसीकरणाचा पाचवा टप्पा सुरू होत आहे. त्यांची नोंदणी सुरू झाल्याने त्यांचा ताण सर्व्हेवर आल्याने अनेक केंद्रावरील नोंदणी करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे धीम्यागतीने लसीकरण सुरू होते. अनेक केंद्रांवर शंभरचा कोटा निश्‍चित करून, लसीकरण करण्यात आले. त्यामुळे अनेक नागरीकांना मनस्ताप सहन करून घरी जावे लागले.

गुरुवारी झालेले लसीकरण

गट - पहिला डोस - दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी - ९९ ३३०

फ्रंटलाइन कर्मचारी - ४७३ ७१७

ज्येष्ठ नागरिक - ११५७ ६६४८

४५ ते ५९ वयोगट - २८६४ २३०२

एकूण पहिला डोस - ४५९३

एकूण दुसरा डोस -९९९७

एकूण लसीकरण - १४,५९०

एकूण पुरवठा - २५०००

शिल्लक ः ११, ४१०