सोमेश्‍वरला ‘तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार’

सोमेश्‍वरला ‘तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार’
Published on

सोमेश्वरनगर, ता. ११ : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून (एनएफसीएसएफ) तृतीय क्रमांकाचा ‘तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. गेली आठ-नऊ वर्षे जिल्ह्यात सर्वोच्च साखर उतारा, गाळपक्षमतेचा १२३ टक्के वापर, तांत्रिक क्षमतेचा कार्यक्षम वापर, अशा उल्लेखनीय कामगिरीमुळे हा पुरस्कार मिळाला आहे. ‘सोमेश्वर’ने सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.
राज्यातला आजवरचा ३८०० रुपये प्रतिटन, असा सर्वोच्च ऊसदर देणाऱ्या सोमेश्वर कारखान्यास सन २०२३-२४ या हंगामात देशभरातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार मिळाला होता. आता सलग दुसऱ्या हंगामातही (२०२४-२५) उच्च उतारा विभागातून (महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक) तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या हंगामात १४४ दिवसांत १२ लाख २४ हजार टन गाळप करून १२.०७ टक्के साखर उताऱ्यानुसार १४ लाख ५६ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली होती. कारखान्याची गाळपक्षमता साडेसात हजार टन प्रतिदिन असताना ९२४७ टन प्रतिदिन क्षमतेने कारखान्याने गाळप केले होते. मोलासेसनिर्मिती ४.३३५ टक्के इतकी असून, बगॅसची टक्केवारी ३.३५९ टक्के इतकी राहिली होती, अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
याबाबत सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष किसन तांबे म्हणाले, ‘‘दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना हा पुरस्कार अर्पण करत आहोत. संचालक मंडळाच्या निर्णयास पाठिंबा देणारे सभासद आणि कार्यक्षम अधिकारी-कामगार, वाहतूकदार, तोडणी कामगार आदींच्या टीमवर्कमुळे हा पुरस्कार मिळाला आहे. मागील पाच वर्षातला हा कारखान्याला नामांकित संस्थेकडून मिळालेला चौदावा पुरस्कार आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च पुरस्कारही याआधी मिळाले आहेत.’’

तांत्रिक क्षमतेचे काही पैलू (टक्केवारीत)
मिल एक्स्ट्रॅक्शन- ९५.७२
रिड्युस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन- ९५.८७
बॉयलिंग हाऊस एक्स्ट्रॅक्शन- ८८.६७
ओव्हरऑल एक्स्ट्रॅक्शन- ८४.८९
शुगर इन केन- १३.९८
गाळपक्षमतेचा वापर- १२३ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com