‘सोमेश्वर’साठी ४३१ अर्ज दाखल

‘सोमेश्वर’साठी 
४३१ अर्ज दाखल
Published on

सोमेश्वरनगर, ता. १० : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदांच्या २१ जागांसाठी तब्बल ४३१ अर्ज आले आहेत. शुक्रवारी (ता. ११) अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून, अर्जांची संख्या सहाशेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
सोमेश्वर हा राज्यातला नामांकित कारखाना आणि सहकाराचे हुकमी केंद्र बनला असल्याने संचालकपदासाठी इच्छुकांची मांदियाळी निर्माण झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत ७ ते ११ सप्टेंबर अशी देण्यात आली होती. आज पाचव्या दिवशी १५८ अर्ज दाखल झाले असून, एकूण अर्जांची संख्या ४३१ वर पोहोचली आहे.
कारखान्याच्या बहुतांश आजी-माजी संचालकांनीही पुन्हा अर्ज दाखल करत आपले नशीब अजमावले आहे. ‘राष्ट्रवादीकडून अर्जांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानेही साठ-सत्तर अर्ज दाखल करण्यात यश मिळविले आहे. याशिवाय भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनीही स्वतंत्र पॅनेल टाकण्याची घोषणा केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचीही अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनीही आज काही अर्ज दाखल केले. यामुळे नेमके किती पॅनेल होतात आणि सत्ताधारी राष्ट्रवादीला आव्हान मिळणार का याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com