

वडगाव निंबाळकर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. १२) माळेगाव बुद्रुक येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे.
बारामती-नीरा मार्गावरील शारदानगर ते माळेगाव राजहंस चौक हा रस्ता सोमवारी सकाळी सातपासून मंगळवारी (ता. १३) सकाळी सातपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. माळेगाव बुद्रुक येथील अजिंक्यतारा मॅजेस्टिक बँक्वेट हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
असा असेल पर्यायी मार्ग
शारदानगर येथून के. व्ही. के. ट्रस्टच्या कॅनॉल रस्त्याने माळेगाव राजहंस चौकात जाता येईल. तसेच राजहंस चौकातून माळेगाव कारखाना मार्गे पाहुणेवाडी, शारदानगर आणि बारामतीकडे जाणाऱ्या मार्गाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वाहतूक बदलातून शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिक व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माळेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.