
सोमेश्वरनगर : साखर, वीज, इथेनॉल, अर्थ अशा सर्वच बाबींमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सोमेश्वर कारखान्याला 'व्हीएसआय'ने राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना ठरविले होते. आता याच कामगिरीमुळे राष्ट्रीय पातळीवरही सोमेश्वरचा डंका वाजला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघानेही (एनएफसीएसएफ) 'सोमेश्वर'ला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केला आहे. मागील वर्षभरात सोमेश्वरला मिळालेला हा मानाचा पाचवा पुरस्कार आहे.