महिला वरिष्ट गट टी-२० क्रिकेट

महिला वरिष्ट गट टी-२० क्रिकेट
Published on

सोनल, ईशाची निर्णायक खेळी

पुणे, ता. १५ ः महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित महिलांच्या एमसीए वरिष्ट गट निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेत सोनल पाटीलचे अर्धशतक आणि कर्णधार ईशा पठारेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर झोरास्ट्रियन संघाने लातूरवर १२९ धावांनी विजय नोंदवला.
आर्यन्स मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना झोरास्ट्रियन संघाने पाच २०१ धावा केल्या यांत सोनल पाटीलने ३७ चेंडूंत पाच चौकार व २ षटकारांसह ५८ धावांची, ईशा पठारेने २२ चेंडूंत सात चौकारांसह ४३ धावांची, तेजल हसबनिसने २५ चेंडूंत दोन चौकारांसह ३६ धावांची, तर दामिनी बनकरने २६ चेंडूंत चार चौकारांसह ३५ धावांची खेळी केली. प्रत्युत्तर देताना संचिता सपाटे, ईशा पठारे, ईशिता खळेच्या अचूक गोलंदाजीसमोर लातूरला ७ बाद ७२ धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक :
१) झोरास्ट्रियन क्लब - (२० षटकांत) ५ बाद २०१ (सोनल पाटील ५८, ईशा पठारे ४३, तेजल हसबनिस ३६, दामिनी बनकर ३५, जान्हवी वीर १-२४) वि. वि. लातूर - (२० षटकांत) ७ बाद ७२ (आरोही सुरवसे २४, संचिता सपाटे ३-१४, ईशा पठारे २-११, ईशिता खळे २-१८)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com