

Residents urged railway authorities to construct a bridge instead of an embankment to protect groundwater and the wildlife corridor.
Sakal
माळेगाव : बारामती–फलटण नवीन रेल्वे लाईन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता.बारामती) येथे पाझर तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिणामी आज गावकऱ्यांनी एकजूटीच्या जोरावर सोनकवाडीचा पाझर तलाव वाचविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. तलावा मधून माती भरावा टाकण्याचे काम शेकडो ग्रामस्थांनी बंद केले. यावेळी स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामध्ये रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, वन विभाग, छोटे पाटबंधारे विभाग आदी प्रशासनातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. मातीच्या भराव्याऐवजी पुल उभारणीचा मार्ग रेल्वेने स्वीकारावा ही मागणी आमची असून त्यामध्ये कोणतीही तडजोड होणार नसल्याचे पुष्कराव जगताप यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी सांगितले.