Daund Crime : दौंडमध्ये मध्यरात्री तरुणाचा खून; सोनवडीतील अरुण पवार यांच्या हत्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

Young Man Murdered in Sonwadi; Two Accused Arrested : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सोनवडी येथे अरुण पवार या ३१ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. कुटुंबातील महिलेच्या विनयभंगाच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Young Man Murdered in Sonwadi; Two Accused Arrested

Young Man Murdered in Sonwadi; Two Accused Arrested

esakal

Updated on: 

दौंड : पुणे जिल्ह्यातील सोनवडी (ता. दौंड) येथे कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा राग मनात धरून विनयभंग करणार्या तरुणाचा धारदार हत्याराने खून करण्यात आला आहे. दौंड पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. अरुण अनिल पवार (वय ३१, रा. सोनवडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...