esakal | बुरशीजन्य आजारावर उपचारासाठी ‘एसओपी’
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

बुरशीजन्य आजारावर उपचारासाठी ‘एसओपी’

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे - म्युकोरोमायकॉसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराच्या (fungal diseases) उपचारासाठी (Treatment) डॉक्टरांच्या (Doctor) विविध संघटना आणि संशोधन संस्थांनी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) (SOP) विकसित केली आहे. रुग्णाचे जलद निदान व्हावे आणि त्याला योग्य शास्त्रीय उपचार मिळण्यासाठी ही कार्यप्रणाली तयार केली आहे. (SOP for treatment of fungal diseases)

कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ आणि दातांच्या डॉक्टरांकडे मुख्यत्वे म्युकोरोमायकॉसिसचे रुग्ण येत आहेत. पुणे ॲप्थॉल्मिक सोसायटी आणि महाराष्ट्र ॲप्थॉल्मिक सोसायटी याबाबतची ‘एसओपी’ तयार करत आहे. कोणत्याही डॉक्टरांकडेही असे रूग्ण आल्यावर तातडीने त्याचे निदान होणे गरजेचे आहे. यासाठी या ‘एसओपी’चा उपयोग होईल.

पुण्यातील नेत्ररोग तज्ज्ञ आणि संशोधक डॉ. नताशा पहुजा म्हणाल्या, ‘‘राज्यातील डॉक्टरांच्या संघटनांसह डोळ्यासाठीची सर्वात मोठी संस्था समजल्या जाणाऱ्या एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटनेही एक एसओपी तयार केली आहे. जवळपास सर्वच एसओपींमधील प्रणाली सारखीच आहे. हा दुर्मिळ आजार असल्यामुळे डॉक्टरांनाही याबद्दल पुरेशी माहिती असेलच असे नाही. यात सूसुत्रता येण्यासाठी या कार्यप्रणालीचा उपयोग होईल.’’

पुण्यासह राज्यातील विविध शहरांत म्युकोरोमायकॉसिसच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा वेळी सर्वदूर अशा कार्यप्रणाली संबंधी जनजागृती होणे गरजेचे आहे.

हेही वाचा: सासवडमध्ये तपासणी किटच संपले, चाचण्यांचा वेग मंदावल्याने मनस्ताप

डॉक्टरांसाठी कार्यप्रणाली

१) आजाराची संभाव्य कारणे

 • अनियंत्रित मधुमेह

 • कोरोना उपचारादरम्‍यान अतिरिक्त स्टेरॉईड आणि इम्युनोमॉड्युलेटरचा वापर

 • जास्त काळ ऑक्सिजनद्वारे उपचार

२) सर्वसाधारण लक्षणे

 • चेहरा दुखणे

 • डोके दुखणे

 • नाक चोंदणे

 • दृष्टी कमी होणे

 • दात, जबडा आदी दुखणे

 • नाकापाशी किंवा चेहऱ्यावर सूज येणे

३) निदान कसे कराल

 • रक्ताची चाचणी (सीबीसी)

 • मधुमेहाची चाचणी (एफबीसी, पीपीबीएस आणि एचबीए१सी)

 • रिनल फंक्शनल टेस्ट

 • नाकातील नमुन्यांद्वारे बुरशीची खात्री करणे

 • नाकातील एंडोस्कोपी करणे

 • एमआरआय करणे

 • सीटी पीएनएस करणे

४) वैद्यकीय व्यवस्थापन

 • लिपोसोमल एम्फोट्रॅसिनिक बीटाचे (एल-एएमबी) ५ ते १० मिलिग्रॅम प्रतिकिलो वजनाप्रमाणे दर दिवशी डोस द्यावा.

 • ड्यूअल थेरपीद्वारे एल-एएमबी आणि ओरल पॉसोकोनाझोल डोस ३०० मिलिग्रॅम बीडी दिवसाला आणि त्यांनंतर ३०० मिलिग्राम ओडी दोन आठवड्यांसाठी

५) शस्त्रक्रिया व्यवस्थापन

 • बुरशीने जर मोठ्या प्रमाणावर शारीरिक हानी केली असेल, तर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागते. अशा वेळी कान-नाक-घसा, नेत्र आणि तोंड किंवा दाताच्या डॉक्टरांनी एकत्रितपणे शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

(स्रोत - एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट)