

वास्तव वेध
प्रभाग क्रमांक २३
PNE26W60873
सोरेगाव : गावठाणातील दुरवस्थेतील स्वच्छतागृहाकडे जाण्याचा भीतीदायक रस्ता.
स्वच्छतागृह कोसळण्याचा धोका, रस्त्यांना मुहूर्त नाही
सोरेगाव, सलगरवस्तीत स्वच्छतागृहांत पाणीच नाही; वारंवार सांगूनही बोअर दुरुस्तीकडे मनपाची डोळेझाक
प्रभुलिंग वारशेट्टी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : हद्दवाढ झाली, मात्र मूलभूत सुविधांसाठीचा वनवास संपलेला नाही, असे चित्र प्रभाग क्रमांक २३ मधील सोरेगाव गावठाण आणि सलगरवस्तीत दिसत आहे. सोरेगावातील महिलांसाठीचे एकमेव सार्वजनिक स्वच्छतागृह धोकादायक बनले असून, ते कधीही कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
सलगरवस्तीतील स्वच्छतागृहातही पाण्याची सोय नाही. बोअर दुरुस्तीसाठी वारंवार सांगूनही महापालिकेच्या संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याची तक्रार आहे. सोरेगावातील अंतर्गत रस्ते पक्के होण्याची प्रतीक्षा कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात पाण्याची अशी अवस्था असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी हे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
-------------------------------
पडण्याचा अन् झुडपातून जाण्याचा दुहेरी धोका
गेल्या १५ वर्षांपासून सोरेगावातील महिलांसाठीचे स्वच्छतागृह धोकादायक स्थितीत आहे. कधीही कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत. पाण्याची सोय नसल्याने स्वच्छतागृहाचा वापर करणेही कठीण झाले आहे. त्यातच झाडाझुडूपांनी स्वच्छतागृहाला इतका वेढा घातला आहे की, सहज पाहिले तर दिसत देखील नाही, अशी स्थिती आहे. सोबतच अंतर्गत अनेक रस्ते अजूनही पक्के नाहीत. कच्च्या रस्त्यांमुळेही नागरिक वैतागले आहेत.
-------------------------------
सलगरवस्तीतील बोअर दुरूस्तीसाठी मनपाची अनास्था
सलगरवस्तीत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाबाहेरची बोअर दुरुस्ती करावी म्हणून लोकप्रतिनिधींनी अनेकदा संबंधित विभागाला कळवले. परंतु महापालिकेचा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत खुद्द लोकप्रतिनिधींनीच केली. जिथे लोकप्रतिनिधीच हतबल तिथे सर्वसामान्यांचे काय होत असेल?
------------------------------------
कोट PNE26W60845
सलगरवस्ती व सोरेगाव गावठाणात स्वच्छतागृहांची व पाण्याची समस्या आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. परिस्थिती लक्षात घेऊन मी माझ्या शेतातील विहिरीचे पाणी महापालिकेने मोफत नेण्याचे आवाहन करत आहे. स्वच्छतागृहांसाठी नक्कीच पाठपुरावा करून समस्या तातडीने मार्गी लावू.
- आरती वाकसे, नगरसेविका
-----------------------------------
कोट PNE26W60846
सोरेगाव गावठाणातील ड्रेनेजचे काम माझ्या कार्यकाळात झाले आहे. स्वच्छतागृहासाठी आवश्यक निधीची मागणी केली आहे. सध्या निधी उपलब्धीसाठी अडचण आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर सोरेगाव गावठाण, सलगर वस्ती येथील स्वच्छतागृहासह रस्त्यांची समस्या सोडवण्यालाच प्रथम प्राधान्य देऊ.
- राजशेखर पाटील, नगरसेवक
----------------------------------
कोट PNE26W60843
सोरेगाव गावठाणात महिलांसाठी म्हणावी अशी स्वच्छतागृहांची सोय नाही. अंतर्गत अनेक रस्ते वर्षानुवर्षे खराब आहेत. महापालिकेने तातडीने या समस्या सोडवण्याची गरज आहे. हद्दवाढीनंतर अजून किती प्रतीक्षा करायची?
- शोभा शिंदे, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.