Baramati News : बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारीला उच्चांकी दर

चांगल्या दर्जाच्या गव्हाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये इतका दर मिळाला
Sorghum prices high per quintal 6051 in Baramati Agricultural Produce Market Committee
Sorghum prices high per quintal 6051 in Baramati Agricultural Produce Market Committee sakal
Updated on

बारामती - येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. 10) ज्वारीला प्रति क्विंटल 6051 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. येथील बाजार समितीत माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकरी हनुमंत तरटे यांच्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला. ज्वारीची आवक कमी असल्याने सध्या ज्वारीला जादा दर मिळत आहे.

दरम्यान चांगल्या दर्जाच्या गव्हाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये इतका दर मिळाला. मक्याला 2771 रुपये प्रति क्विंटर, बाजरी, हरभरा, तुर उडीद, खपल या शेतमालाची आवक होऊन बाजरीला प्रति क्विंटल 2501, हरभरा 4781, तूर 9011, उडीद 8140 व खपलसाठी 2520 रुपये प्रतिक्विंटल भाव निघाला.

Sorghum prices high per quintal 6051 in Baramati Agricultural Produce Market Committee
Baramati : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीला पंतप्रधान मोदी यांना बारामतीत आणणार;बावनकुळे

खरेदीदार म्हणुन आवारातील बाळासाहेब फराटे, महावीर वडूजकर, मिलिंद सालपे, शशिकांत सालपे, जगदिश गुगळे, दीपक मचाले, अशोक भळगट, सतीश गावडे यांनी सहभाग घेतला. बाजार आवारात शेतमालास चांगला दर मिळत असल्याने शेतक-यांनी आपला शेतमाल स्वच्छ व ग्रेडींग करून आणल्यास आणखी चांगला दर मिळेल अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी दिली.

Sorghum prices high per quintal 6051 in Baramati Agricultural Produce Market Committee
Baramati Police: बारामती पोलिसांच्या तत्पपरतेबाबत प्रश्नचिन्ह; अशा घटनांचे पोलिसांना नाही गांभीर्य?

आणखी एक ग्रेडींग मशीन बसविण्याचा मानस...

ज्वारीची आवक माण, दहिवडी या तालुक्यातुन आहे. बारामतीसह इंदापुर, दौंड, फलटण या तालुक्यातुन शेतमालाची आवक होते. मुख्य बाजार आवारात ग्रेडींग मशीन असल्याने शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा.

Sorghum prices high per quintal 6051 in Baramati Agricultural Produce Market Committee
Baramati : बारामती अजितदादांचीच ! बंडानंतर बारामती मधील पहिली निवडणुक केली बिनविरोध

यासाठी आणखी एक नवीन मशीन बसविण्याचा समितीचा मानस आहे. शेतक-यांचा शेतमाल कमी वेळेत जादा स्वच्छ होईल. त्यामुळे त्याचा आर्थिक फायदा शेतक-यांना होईल. तसेच समितीने आवारात शेतमाल आल्यानंतर प्रथम वजन नंतर लिलाव अशी सुविधा असल्याने शेतक-यांना लगेच पेमेंट मिळत आहे. त्यामुळे शेतक-यांनी आपला शेतमाल बारामती बाजार आवारात विक्रीस आणावा असे आवाहन सचिव अरविंद जगताप व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.