

A one-year-eight-month-old girl died after being run over by a tempo while it was being reversed at a nursery near Sortapwadi Phata.
Sakal
उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या सोरतापवाडी फाटा येथील ओंकार रोज नर्सरीमध्ये टेम्पो मागे घेताना झालेल्या अपघातात दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुणे-सोलापूर रोडजवळील सोरतापवाडी फाटा येथील ओंकार नर्सरीमध्ये दि.१३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली.