

CM Devendra Fadnavis’ Appeal Against Hoardings
Sakal
स्वारगेट : होर्डिंग्ज, फ्लेक्स लावून पुण्याचे विद्रुपीकरण करू नका, असा सल्लावजा आदेश महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. या मुलाखतीनंतर निकाल लागला आणि शहरभर भाजपसह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदनाचे फ्लेक्स, होर्डिंग्ज झळकावून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.