पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाचा सांगावा आला आहे. अंदमान-निकोबार बेट समूहावर मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. येत्या मंगळवार (ता. १३) पर्यंत मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांवर दखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मॉन्सूनचे अंदमानात वेळेआधी दाखल होण्याचे संकेत असल्याने केरळातील लवकर आगमनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.