Southwest Monsoon Withdrawal
esakal
पुणे
Southwest Monsoon Withdrawal : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मॉन्सूनची माघार; दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय, वातावरणाची कशी असेल स्थिती?
Monsoon Withdrawal Marks Seasonal Shift in India : नैऋत्य मॉन्सूनची माघार घेतल्यानंतर ईशान्य मॉन्सून दक्षिण भारतात सक्रिय झाला आहे. पावसाळी बदलामुळे शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून रब्बी हंगामात दिलासा मिळेल.
Summary
नैऋत्य मॉन्सून माघारी गेल्यानंतर ईशान्य मॉन्सून सुरू झाला आहे.
दक्षिण भारतात पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार का?
शेती व रब्बी पिकांसाठी पावसाचा लाभ होणार आहे.
पुणे : शेतीप्रधान भारतासाठी वरदान ठरलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अखेर आज देशाचा निरोप घेतला. देशातील कृषी, जलसाठा आणि पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा पावसाळी हंगाम यंदा समाधानकारक ठरल्याचे हवामान विभागाने नमूद केले. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मॉन्सून माघारी गेल्यानंतर आता दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय झाल्याचेही विभागाने अधिकृतरीत्या जाहीर केले.