सॉव्हरेन गोल्ड बाँड्सच्या मूळ गुंतवणुकदारांनाच मिळणार कर सवलतीचा फायदा
बाँडच्या मूळ गुंतवणुकदारांनाच फायदा
सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या कर सवलतीबाबत मोठा निर्णय
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १ ः रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सॉव्हरेन गोल्ड बाँडवरील (एसजीबी) भांडवली नफा कर सवलत केवळ मूळ गुंतवणुकदारांपुरती मर्यादित करण्यात आल्यामुळे दुय्यम बाजारातून हे बाँड खरेदी केलेल्यांची निराशा झाली आहे. विशेष म्हणजे जे मूळ गुंतवणूकदार मॅच्युरिटी पूर्ण होईपर्यंत बाँड स्वतःजवळ ठेवतील, त्यांनाच भांडवली नफा कर सवलत प्राप्त होणार आहे.
रिझर्व्ह बँकेने मागील काही वर्षांत विविध स्वरूपाचे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले आहेत. या बाँडवरील भांडवली नफा कर सवलतीच्या अनुषंगाने जास्त स्पष्टता आणली जात असल्याचे सांगत केंद्र सरकारने वरील बाबी स्पष्ट केल्या आहेत. सॉव्हरेन गोल्ड बाँड हे सरकारी गोल्ड बाँड आहेत. सोन्याच्या दरातील चढ-उतारावर या बाँडचे दर बदलतात. गत वर्षभरात सोन्याच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
मुदत संपेपर्यंत जे धारक बाँड धारण करतील, त्यांना भांडवली नफा करात सवलत देण्याची तरतूद आतापर्यंत होती. आयकर खात्यातील तरतुदीनुसार जारी करण्यात आलेले प्रत्येक बाँड सिरीज ही स्वतंत्र समजली जाईल. अर्थसंकल्पातील ताज्या प्रस्तावामुळे दुय्यम बाजारातून बाँड खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना एक एप्रिल २०२६ पासून भांडवली नफा कर सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कर बचतीच्या दृष्टीने सॉव्हरेन गोल्ड बाँड हे अलीकडील काळात गुंतवणुकदारांची पसंत बनले होते. नव्या तरतुदीमुळे या बाँड मधील गुंतवणुकीवर परिणाम होणार काय? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

