
पुणे : मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने आता उघडीप दिल्याने पेरण्यांना वेग आला आहे. पुणे विभागात चार लाख ५१ हजार ५०७ हेक्टर म्हणजेच ३६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मॉन्सूनपूर्व पाऊस जोरदार झाल्याने आणि मॉन्सून लवकर राज्यात आल्याने पूर्व मशागतीचा फटका खरीप हंगामाच्या पिकांच्या वाढीवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.